Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचवा सीझन संपला असली तरीही या शोमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांचं आपआपसांत एक वेगळं बॉण्डिंग तयार झालं. ही सगळी नाती या कलाकारांनी शो संपल्यावरही जपली आहेत. ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकर आणि डीपी म्हणजेच धनंजय पोवार यांचं घरात भावा-बहिणीचं सुंदर असं नातं तयार झालं होतं. अंकिताने रक्षाबंधनला डीपीला राखी सुद्धा बांधली होती. संपूर्ण सीझन डीपी अंकिताची लहान बहिणीप्रमाणे काळजी घेताना दिसला. यासाठीच ‘कोकण हार्टेड गर्ल’च्या होणाऱ्या नवऱ्याने धनंजय पोवारचे आभार मानले आहेत. याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंकिता वालावलकर ‘बिग बॉस’च्या ( Bigg Boss Marathi ) घरात अनेकदा ‘एक ऐसे गगन के तले’ हे किशोर कुमार यांचं जुनं गाणं गायची. हे गाणं गाताना ती नेहमी कुणालची आठवण काढायची. आता धनंजय पोवारने त्याची पत्नी हेच गाणं गुणगुणत असल्याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत डीपीने याला “बिग बॉस’ची आठवण झाली एकदम” असं कॅप्शन देत यामध्ये अंकिता आणि कुणाल यांना टॅग केलं होतं. या सुंदर व्हिडीओवर आता अंकितासह तिच्या होणार्‍या नवऱ्याने खास कमेंट केली आहे.

हेही वाचा : थायलंडला बॅचलर पार्टी, कोल्हापुरात केळवण! मराठमोळ्या अभिनेत्रीच्या घरी लगीनघाई; फोटो आले समोर

अंकिता लिहिते, “बिग बॉस’ शो मला कधी आवडला नव्हता… मी कधी तो शो बघितला पण नव्हता… तिथे जाऊन आपली भेट झाली आणि मला घरातलं माझं कोणीतरी हक्काचं भांडायला मिळालं. जिथे मी रूसू शकते ओरडू शकते. तुम्ही होता म्हणून मी होते. हे गाणं कुणाल माझ्यासाठी म्हणतो, कारण त्याला वाटतं आता पुरे झालं तुला मी एवढं आनंदी ठेवेन की, तू कधी रडली नाही पाहिजेस फक्त प्रेम… तेच गाणं मी गुणगुणत अख्खा Season घालवला. हा विचार करून की, बाहेर छान आयुष्य आहे सगळं नीट होईल, त्यात तुम्ही माझी घेतलेली काळजी जी बाहेर दाखवली गेलीच नाही. ती मी, कुणाल आणि माझी अख्खी Family कधीही विसरणार नाही. आयुष्यभर असेच राहा.” असं सांगत कोकण हार्टेड गर्लने पुढे भावुक झाल्याचे इमोजी दिले आहेत.

अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची खास कमेंट

याशिवाय अंकिताचा होणारा नवरा कुणाल भगत डीपीच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत लिहितो, “अंकिता या गाण्याचा अर्थ ज्यांना कळला त्यांना कदाचित प्रेम कळलं, बिग बॉसमध्ये असताना या गाण्याच्या रुपात मी कायम अंकिताबरोबर होतो आणि त्याची जाणीव करून देण्यासाठी डीपी दादा तुम्ही होता, तुम्हाला त्या गाण्याचा अर्थ कळला. डीपी दादा खंबीरपणे तुम्ही अंकिताबरोबर उभे राहिलात हे मी कधीही विसरणार नाही. त्यासाठी तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. अंकिता बाहेरून जगाला स्ट्राँग दिसली तरी, अंकिता तुम्हाला आतून कळली त्यासाठी आणि तिची घेतलेली काळजी जी मी अंकिताकडून रोज ऐकतो या सगळ्यांसाठी तुमचे आभार. लग्नाला नक्की या!!! हवा तेवढा जोरात कान पिळा”

हेही वाचा : “देवमाणूस आहेत दादा…”, अजित पवार उपमुख्यमंत्री होताच सूरज चव्हाण पोहोचला मंत्रालयात! नव्या घराबद्दल म्हणाला…

अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची खास कमेंट ( Bigg Boss Marathi )

धनंजय पोवार आणि अंकिताचं शो ( Bigg Boss Marathi ) संपल्यावरचं हे सुंदर बॉण्डिंग पाहून नेटकरी सुद्धा भारावून गेले आहेत. आता अंकिताच्या लग्नाला तिचे लाडके ‘डीपी दादा’ कशी धमाल करणार, हे पाहण्यासाठी दोघांचेही चाहते आतुर आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi ankita walawalkar fiance kunal express gratitude towards dhananjay powar sva 00