Bigg Boss Marathi Fame Ankita Walawalkar and Dhananjay Powar : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व संपलं असलं, तरीही या शोमधले सगळे स्पर्धक आताही घराघरांत चर्चेत आहेत. शो संपला तरी या सगळ्या स्पर्धकांमधली मैत्री आजही कायम आहे. नुकतंच अभिजीत सावंत, योगिता चव्हाण, निखिल दामले यांचं रियुनियन पाहायला मिळालं होतं. याशिवाय वैभव-इरिना आधी सूरजच्या गावी आणि त्यानंतर कोल्हापूरात धनंजयच्या घरी गेले होते. आता या पाठोपाठ ‘कोकण हार्टेड गर्ल’ने इचलकरंजी गाठलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंकिता आणि धनंजय पोवार यांची मैत्री ‘बिग बॉस’च्या आधीपासूनची आहे. मात्र, घरात प्रवेश घेतल्यावर या दोघांचं भावा-बहिणीचं नातं अजून घट्ट झालं. पहिल्या दिवसापासून अंकिताचे डीपी दादा तिच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले होते. खेळात या दोघांनी एकमेकांना खूप चांगली साथ दिली. अंकिता-डीपीमध्ये अनेकदा खटके देखील उडाले पण, या भांडणांचा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर काहीच परिणाम झाला नाही. उलट या भावा-बहिणीचं नातं आणखी घट्ट झालं.

हेही वाचा : इंडस्ट्री सोडून विदेशात झाली स्थायिक; ‘ही’ मराठी अभिनेत्री लग्नानंतर ५ वर्षांनी होणार आई! बाळाच्या जन्माआधी केलं जेंडर रिव्हिल

ग्रँड फिनाले पार पडल्यावर घराबाहेर आल्यावर अंकिता व धनंजय यांनी एकत्र केक कापून सेलिब्रेशन केलं होतं. यानंतर पुढच्या दोन दिवसात धनंजय पोवार कोल्हापूरला परतला. तर, अंकिता तिच्या कामात व्यग्र झाली. नुकतीच अंकिता दिवाळीनिमित्त घरी कोकणात परतली आहे. त्यामुळे मालवणातून या ‘कोकण हार्टेड गर्ल’ने आपला मोर्चा इचलकरंजीच्या दिशेने वळवला. अंकिता आधी धनंजयच्या दुकानात म्हणजेच सोसायटी फर्निचरमध्ये गेली त्यानंतर ती डीपीच्या घरी देखील गेली.

अंकिता व तिच्या होणाऱ्या नवऱ्याने धनंजयच्या आई-बाबांचे आशीर्वाद घेतले. यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंकिताने डीपीला भाऊबीज केली. याचे सुंदर फोटो आता या दोघांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. धनंजयने या फोटोला ‘भाऊ बीज प्रक्रिया संपन्न’ असं कॅप्शन दिलं आहे.

हेही वाचा : प्रथमेश परबने दिव्यांग मुलांसह साजरी केली लग्नानंतरची पहिली दिवाळी! त्याच्या पत्नीने लिहिली सुंदर पोस्ट; सर्वत्र होतंय कौतुक

अंकिता धनंजयच्या घरी पोहोचली ( Bigg Boss Marathi Fame Ankita Walawalkar and Dhananjay Powar )

अंकिता धनंजयला भाऊबीज करणाऱ्या फोटोवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “ओवाळणी दे दादा तिला नाहीतर लग्नात लय मोठ फर्निचर द्यावं लागेल तुला”, “डीपी दादा आणि अंकिता”, “खूप सुंदर नातं” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या फोटोंवर दिल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi ankita walawalkar went to kolhapur for celebrating bhaubeej with dhananjay powar sva 00