Bigg Boss Marathi Season 5 : बहुचर्चित व बहुप्रतिक्षीत अशा ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाला जोरदार सुरुवात झाली आहे. २८ जुलैपासून सुरू झालेलं ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे. या पर्वातील स्पर्धकांनी पहिल्या दिवसापासूनच स्वतःची रणनीती दाखवण्यास सुरुवात केली आहे. एवढंच नव्हे तर घरात दोन गटही झाले आहेत. वाद होताना दिसत आहेत. निक्की तांबोळी सतत वर्षा उसगांवकर यांचा करत असलेल्या अपमानावरून अनेक मराठी कलाकारांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. पुष्कर जोग, जय दुधाणे, प्रणित हाथे, उत्कर्ष शिंदे अशा अनेकांनी निक्की तांबोळी विरोधात सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर आता ‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेत्याने ‘बिग बॉस मराठी’च्या ( Bigg Boss Marathi ) घरात सूरज चव्हाणला मिळणाऱ्या वागणुकीवरून संतप्त पोस्ट शेअर केली आहे.

‘गुलीगत धोका’ फेम रीलस्टार सूरज चव्हाण सध्या चांगला खेळताना दिसत आहे. पण या पहिल्याच आठवड्यात घरातील इतर सदस्यांनी सूरजला नॉमिनेट केलं आहे. त्याला फारसा गेम न समजल्याचं कारण नॉमिनेट केलेल्या सदस्यांनी दिलं आहे. तसंच निर्णय घेण्यासाठी सक्षम नसलेल्या तीन स्पर्धकांमध्ये देखील सूरज चव्हाणची निवड इतर सदस्यांनी केली आहे. त्यामुळे सूरजला सतत टार्गेट करत असल्याचं कलाकार मंडळी म्हणत आहेत. पण काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस’ने सूरजला कन्फेशन रुममध्ये बोलावून त्याचं ब्रेशवॉश केलं. “सूरज बिनधास्त खेळा, कोणालाही न घाबरता खेळा” असा सल्ला थेट ‘बिग बॉस’ने दिला. तेव्हापासून सूरजचा जबरदस्त खेळ पाहायला मिळत आहे. अशातच ‘चला हवा येऊ द्या’ फेम अंकुर वाढवेने फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. ज्यामध्ये ‘बिग बॉस’च्या ( Bigg Boss Marathi ) घरात सूरजला मिळणाऱ्या वागणुकीविषयी संताप व्यक्त केला आहे.

Colors Marathi Bigg Boss Marathi season 5 will be re-broadcasted
Bigg Boss Marathi 5: पुन्हा एकदा तोच राडा अन् ‘भाऊचा धक्का’ पाहायला मिळणार; तारीख, वेळ जाणून घ्या…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
suraj chavan
ठरलं! सूरज चव्हाणचा ‘झापूक झुपूक’ चित्रपट ‘या’ तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Bigg Boss 18 Fame Rajat Dalal talk about chahat pandey and controversy
Video: चाहत पांडेचं नाव ऐकताच रजत दलालने जोडले हात, विनंती करत म्हणाला…
two friends conversation capital of a nation joke
हास्यतरंग : राजधानी…
Marathi actor saurabh gokhale
“मराठी हॉटेल मालकांचे परप्रांतीय वेटर, मॅनेजर…”; मराठी अभिनेता पोस्ट करत म्हणाला, “बेताल, बेलगाम…”
husband wife conversation not doinng own work joke
हास्यतरंग : हा आरोप…
vivian dsena first reaction after karenveer mehra won bigg boss 18
करणवीर मेहरा Bigg Boss 18 चा विजेता ठरल्यावर विवियन डिसेनाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, “त्याच्या…”
Bigg Boss Marathi

हेही वाचा – Bigg Boss Marathi : वर्षा उसगांवकर-निक्की तांबोळीच्या वादावर किशोरी शहाणेंनी मांडलं स्पष्टच मत, कोणाची बाजू घेतली? जाणून घ्या…

अंकुर वाढवेची पोस्ट वाचा…

अंकुर वाढवे म्हणाला, “दोन्ही वेळेची भांडी, साफसफाई, चपला ज्या त्याच्या नाहीत तरीही सूरजने का करावं? सूरज सारखा काहीच होऊ शकत नाही (जे समाजवेगळे दिसतात, वागतात, बोलतात अशा सगळ्याना बोलणारे ९०%) तो या शो मध्ये या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करतोय. तरीही सगळ्यांना आपला गेम खेळायचा आहे. पण तो सगळं बघून घाबरलाय. हापशीवर (हँडपंप) होणाऱ्या भांडणापेक्षा हे लय बेकार आहे आणि एवढे सुंदर दिसणारे लोक असे का वागत असतील? कदाचित यात तो अडकलाय. बाकी लोकं, भांडी घासता येत नाही म्हणून रडणारे आणि जरी तुझे जोडे नसतील तर ते बाजूला ठेव सांगणारे आणि माझे नाहीत मी नाही उचलणार म्हटल्यावर सूरजवर चढ चढ चढतात! बाकी जातीवाद, वर्णवाद आणि वर्गवाद, सहानुभूती यावर मी बोलू शकत नाही. एवढी माझी समज नाही.”

हेही वाचा – ‘बालिशपणा’, ‘पागल’ म्हणणाऱ्यांना सोनाली कुलकर्णीने दिलं चांगलंच उत्तर, म्हणाली…

दरम्यान, अभिनेता अंकुर वाढवेची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या पोस्टच्या माध्यमातून अंकुरने मांडलेली भूमिका योग्य असल्याचं चाहते, नेटकरी म्हणत आहेत.

Story img Loader