Bigg Boss Marathi Season 5 : बहुचर्चित व बहुप्रतिक्षीत अशा ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाला जोरदार सुरुवात झाली आहे. २८ जुलैपासून सुरू झालेलं ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे. या पर्वातील स्पर्धकांनी पहिल्या दिवसापासूनच स्वतःची रणनीती दाखवण्यास सुरुवात केली आहे. एवढंच नव्हे तर घरात दोन गटही झाले आहेत. वाद होताना दिसत आहेत. निक्की तांबोळी सतत वर्षा उसगांवकर यांचा करत असलेल्या अपमानावरून अनेक मराठी कलाकारांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. पुष्कर जोग, जय दुधाणे, प्रणित हाथे, उत्कर्ष शिंदे अशा अनेकांनी निक्की तांबोळी विरोधात सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर आता ‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेत्याने ‘बिग बॉस मराठी’च्या ( Bigg Boss Marathi ) घरात सूरज चव्हाणला मिळणाऱ्या वागणुकीवरून संतप्त पोस्ट शेअर केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा