Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या पाचवा आठवडा सुरू झाला असून ‘ए’ टीममध्ये उभी फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे. पहिल्या दिवसापासून अरबाज, वैभव, निक्की, जान्हवी, घन:श्याम हे सदस्य एका ग्रुपमध्ये खेळत होते. परंतु, रविवारी रितेश देशमुखने भाऊच्या धक्क्यावर निक्कीला तिच्या विरोधात घरात मागून काय-काय बोललं जातं याच्या क्लिप्स दाखवल्या. यात आपलीच मित्रमंडळी आपल्या मागून गॉसिप करत असल्याचं निक्कीने पाहिलं आणि ती भयंकर संतापली. सर्वांसमोर तिने ‘ए’ ग्रुपमधून एक्झिट घेतल्याचं जाहीर केलं.

आता घरात मैत्रीत फूट पडल्याने संपूर्ण समीकरण बदलून गेलं आहे. अशातच ‘बिग बॉस’कडून या आठवड्यात जोड्यांचा टास्क देण्यात आला आहे. घरात मानकाप्याची दहशत असल्याने घरातील प्रत्येक सदस्याला जोडीने फिरणं भाग आहे. कोणताच सदस्य एकटा फिरू शकत नाही असं ‘बिग बॉस’कडून जाहीर करण्यात आलं. यानंतर घरात एकूण ६ जोड्या बनवण्यात आल्या आहेत. निक्कीच्या जोडीला अभिजीत असेल. तर, अरबाज – आर्याची जोडी ‘बिग बॉस’ने बनवली आहे.

Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
punha kartvya aahe
Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”
Navri Mile Hirlarla
Video : “आज मी सगळी गडबड…”, दु:खात असलेल्या लीलाला आली एजेची आठवण; मालिकेत येणार ट्विस्ट, पाहा प्रोमो
Rahul Gandhi Narendra Modi Gautam Adani (2)
VIDEO : संसदेच्या आवारात राहुल गांधींनी घेतली ‘मोदी-अदाणीं’ची मुलाखत? विरोधी खासदारांनीच घातले मुखवटे
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “डॅडीसारखा देवमाणूस…”, शत्रूचे स्वप्न पूर्ण होणार अन् तेजूचे आयुष्य पालटणार; सूर्याने केली बहिणीची पाठवणी, पाहा प्रोमो
Punha Kartvya Aahe
Video: “तू काय प्रेम करणार?”, आकाशची वसुंधरावर नाराजी; प्रेक्षकांनी केले कौतुक, म्हणाले, “तुमची जोडी…”

हेही वाचा : Bigg Boss Marathi- ‘बिग बॉस’ने तयार केल्या एकूण ६ जोड्या! सदस्यांसाठी अनोखा टास्क; निक्की-अभिजीत तर, अरबाजच्या जोडीला आहे…

अरबाजने ‘बिग बॉस’च्या घरात केला मोठा राडा

निक्की व अभिजीतची मैत्री अरबाजला गेल्या अनेक दिवसांपासून खटकत होती. अखेर त्याचा सगळा राग आजच्या ( २७ ऑगस्ट ) भागात बाहेर आल्याचं पाहायला मिळेल. निक्की – अभिजीत किचनमध्ये एकत्र काम करत असताना तिकडे अरबाज येतो. अरबाज आणि निक्कीची शा‍ब्दिक बाचाबाची होते. यानंतर चिडलेला अरबाज घरात भांडी फोडतो.

अरबाज घरातली भांडी फोडून शांत न बसता बेडरुममध्ये जाऊन सामानाची तोडफोड करतो. “तू मला हर्ट करतेय…” असं अरबाज निक्कीला ओरडून सांगत असल्याचं या नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. कितीही भांडण झालं तरीही ‘बिग बॉस’च्या घरात तोडफोड करणं नियमानुसार चुकीचं आहे. त्यामुळे आता रितेश देशमुख यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Bigg Boss Marathi
निक्की – अभिजीत ( Bigg Boss Marathi : फोटो सौजन्य – कलर्स मराठी )

हेही वाचा : Bigg Boss Marathi : Video : “आता शांत बसायचं, तुमचा गेम संपलाय…”, रितेश भडकल्यावर घन:श्यामने रडून जोडले हात! नेमकं काय घडलं?

दरम्यान, “अरबाजच्या फीलिंग्ज झाल्या आहेत hurt, भांडी फुटून कल्ला झालाय जबरदस्त” असं भन्नाट कॅप्शन देत ‘कलर्स मराठी’ वाहिनीने हा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. आता संपूर्ण आठवडाभर स्पर्धकांना अशाच जोड्या बनवून घरात वावरायचं आहे. त्यामुळे याचा घरातील अन्य सदस्यांच्या मैत्रीवर काय परिणाम होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Story img Loader