Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात दररोज वेगवेगळे ट्विस्ट येत असल्याचं पाहायला मिळत आहेत. घरात पहिल्या दिवसापासून दोन गट पडले आहेत. पहिला गट आहे टीम ‘ए’ आणि दुसरा गट आहे टीम ‘बी’. यातील ‘ए’ ग्रुपमध्ये निक्की, अरबाज, जान्हवी आणि वैभव आहेत. तर, टीम ‘बी’मध्ये अभिजीत, आर्या, अंकिता, डीपी, पॅडी, सूरज, वर्षा हे सदस्य आहेत. दोन्ही गट घरात एकमेकांशी जोरदार भांडणं करत असतात. तर, टास्कमध्येही हे दोन्ही ग्रुप एकमेकांशी वाद घालत असल्याचं पाहायला मिळतं.

घरात ( Bigg Boss Marathi ) या दोन्ही ग्रुपमध्ये कितीही भांडणं असली तरीही अभिजीत आणि निक्की यांची एकमेकांशी खूप चांगली मैत्री आहे. दोघेही अनेकदा एकमेकांसाठी स्टॅण्ड घेताना दिसतात. अभिजीत निक्कीला खूपदा समजावताना दिसतो. परंतु, त्यांची ही मैत्री निक्कीच्या ग्रुपला अमान्य आहे. याच कारणावरून घरात वाद सुरू आहेत.

Saif Ali Khan House Help Video
हाताला पट्टी अन् कपड्यांवर रक्ताचे थेंब, सैफ अली खानबरोबर हल्ल्यात जखमी झालेल्या मदतनीसचा Video Viral
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
bollywood actors went to kareena home to meet her and kids
Video : सैफला भेटून बहिणीचे डोळे पाणावले! करण जोहर, रणबीरसह ‘हे’ बॉलीवूड कलाकार पोहोचले करीनाच्या भेटीला
Punha kartvya ahe
Video : “आता शिक्षेला…”, वसुंधरा व तनयाला जलसमाधी घ्यावी लागणार; ‘पुन्हा कर्तव्य आहे’मध्ये काय घडणार?
Lakhat Ek Aamcha Dada
Video: ‘लाखात एक आमचा दादा’मध्ये मारामारीच्या सीनचे ‘असे’ झाले शूटिंग; पाहा व्हिडीओ
Maharashtrachi Hasya Jatra Fame Rohit Mane new car
Video : “साताऱ्याची माणसं ‘THAR’ वेडी…”, म्हणत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने घेतली नवीन गाडी! सर्वत्र होतंय कौतुक
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”

नॉमिनेशन टास्कदरम्यान अभिजीतला वैभवला नॉमिनेट करायचं असतं. यासाठी दोन्ही ग्रुपमध्ये घन:श्याम आधी अभिजीतला नॉमिनेट करा आणि त्यानंतर अभिजीत वैभवला नॉमिनेट करणार अशी डील होती. परंतु, घन:श्यामने आधी नॉमिनेट केल्यावर अरबाज शेवटच्या राऊंडमध्ये पॅडीला नॉमिनेट करण्यासाठी उभा राहणार असतो. यावेळी निक्की, “तू शब्द दिलाय…असं करू नका” ही गोष्ट आपल्या मित्रांना सांगते. टास्क संपल्यावर आर्या, इरिना, अभिजीत, वैभव नॉमिनेट होतात. परंतु, या सगळ्याचा परिणाम वैभववर होतो.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : वैभवची ‘ती’ डील फसली! बेघर होण्यासाठी नॉमिनेट झाले ४ सदस्य, कोण आहेत ते?

निक्कीला टास्कमध्ये अभिजीतची बाजू घेण्याची गरज नव्हती अशी ग्रुप ‘ए’मध्ये चर्चा रंगते. आता निक्कीने अभिजीतची बाजू घेतल्याने अरबाज तिच्यावर प्रचंड वैतागतो. टीम ‘ए’च्या मैत्रीत देखील हळुहळू फुट पडत असल्याचं सध्या पाहायला मिळतलंय. नुकत्याच समोर आलेल्या नव्या प्रोमोमध्ये निक्की, वर्षा व अभिजीतला नेमकं काय म्हणाली पाहूयात…

Bigg Boss Marathi : अरबाज-निक्कीमध्ये वाद

अरबाजबद्दल निक्की, वर्षा-अभिजीतला सांगते, “त्याचं म्हणणं हेच आहे की, आम्ही सगळे याच्या ( अभिजीत ) विरोधात आहोत. तर, तू याच्या विरोधात का नाही आहेस?” तर, दुसरीकडे अरबाज जान्हवी, इरिना, अंकिता एकत्र असताना त्यांना सांगतो, “तुम्ही ( निक्की-अभिजीत ) आता एकमेकांशी एवढं बोलता तर, दिवसभर बोला ना…जेव्हा अभिजीतसमोर असेल ना तेव्हा प्लीज मध्ये नको येऊ… मी आता बैल झालोय…सांड आता मी कुठेही भिडणार…”

दरम्यान, अभिजीतशी मैत्री ठेवल्यामुळे सध्या अरबाज निक्कीवर चांगलाच संतापल्याचं पाहायला मिळत आहे. आता नव्या भागात काय होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Story img Loader