Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या कॅप्टन पदासाठी एक नवीन टास्क सुरू आहे. या टास्कमध्ये वर्षा, अरबाज, सूरज आणि धनंजय असे चार जण कॅप्टन पदासाठी दावेदार आहेत. जो टास्कमध्ये बाजी मारणार त्याला या घराचा नवीन कॅप्टन होण्याची संधी मिळणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस’च्या घरात कॅप्टन्सीसाठी दावेदार असलेल्या चारही सदस्यांना एक अनोखा टास्क दिला आहे. यांच्या पुढ्यात पाण्याने भरलेले चार डबे ठेवल्याचं पाहायला मिळत आहे. या डब्यांमध्ये गोड पाणी आहे असं अरबाज प्रोमोमध्ये म्हणतोय…पण, हे पाणी प्यायल्यावर काही सदस्यांची अवस्था खूपच बिकट झाली होती. त्यामुळे आपल्याला हव्या त्या सदस्याला कॅप्टन बनवण्यासाठी घरातील अन्य सदस्यांना बीबी करन्सीचा त्याग करून हे पाणी सुद्धा प्यावं लागणार आहे. एक ग्लास पाणी पिण्याआधी निक्की अरबाजला १० उठाबशा काढायला लावणार आहे.

हेही वाचा : ठरलं तर मग : प्रतिमाची वाचा पत आली! लेकीसाठी पूर्णा आजीला अश्रू अनावर, तर प्रिया घाबरून…; पाहा मालिकेचा भावुक प्रोमो

Bigg Boss Marathi : अरबाजने केलं जान्हवीचं कौतुक

निक्कीने उठाबशा काढ असं सांगताच अरबाज देखील लगेच तिचं ऐकतो आणि १० उठाबशा काढतो. यानंतर अरबाज जान्हवीला हे पाणी प्यायची विनंती करतो. यावर जान्हवी त्याला, “माझं कौतुक कर, फ्लर्ट कर असं सांगते” यावर अरबाज तिला म्हणतो, “तुझे डोळे किती सुंदर आहेत गं जान्हवी…तुझे डोळे पाहून…तुझ्या डोळ्यात हरवून जावंस वाटतं. इतके सुंदर डोळे आहेत तुझे…तुझ्या डोळ्यातून मी तुझ्या मनात जाऊ शकतो जान्हवी” अरबाजचं फ्लर्टिंग पाहून सगळेच हसु लागतात.

Bigg Boss Marathi : घरातील नवीन कॅप्टन्सी टास्क

हेही वाचा : Bigg Boss Marathi- “Strategy त्यांच्याबरोबर करणार आणि आम्ही…”, पंढरीनाथने वर्षा उसगांवकरांना थेट विचारला जाब, नेटकरी म्हणाले, “भाऊ मस्तच…”

अरबाज जान्हवीचं कौतुक करतोय हे पाहताच निक्की म्हणते, “बाई हे खूप होतंय…मी जेलस ( एखाद्यावर जळणं ) होतेय…इथे फ्लर्टिंग चालू आहे. बघा बिग बॉस” अरबाजने जान्हवीचं कौतुक सुरू केल्यावर निक्कीची प्रतिक्रिया अगदी पाहण्यासारखी होती. खरंतर, अरबाज-जान्हवी पहिल्या दिवसापासून एकमेकांना भाऊ-बहीण बोलत असल्याने यावर निक्की जास्त चिडली नाही. पण, आता टास्क ( Bigg Boss Marathi ) संपल्यावर निक्की अरबाजला यावरून काय बोलणार की हसत-खेळत सगळ्याकडे दुर्लक्ष करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi arbaz flirt with jahnavi nikki jealous reaction watch video sva 00