Bigg Boss Marathi Arbaz Nikki Controversy : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व अरबाज-निक्कीच्या मैत्रीमुळे सर्वाधिक गाजलं. पहिल्या दिवसापासून घरात या दोघांच्या प्रेमाचे वारे वाहू लागले होते. मात्र, यादरम्यान अरबाजने संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसमोर ‘कमिटेड’ असल्याचं मान्य केलं होतं. प्रेक्षकांची कमी मतं मिळाल्यामुळे आठव्या आठवड्यात अरबाजने घराचा निरोप घेतला. यावेळी निक्की ढसाढसा रडली होती.
अरबाजच्या एलिमिनेशननंतर निक्की पूर्णपणे बिथरली होती. याच आठवड्यात ‘फॅमिली वीक’ टास्क पार पडला होता. निक्कीचे आई-बाबा लाडक्या लेकीला भेटण्यासाठी यावेळी घरात आले होते. घरात आल्यावर प्रमिला तांबोळी यांनी अरबाजचा साखरपुडा झाल्याचं कानावर आलंय असं निक्कीला सांगितलं होतं. याशिवाय अरबाजच्या आईने मुलाखतीदरम्यान केलेली अनेक वक्तव्य प्रमिला यांनी लेकीला सांगितली होती. यामुळे निक्की प्रचंड संतापली आणि तिने अरबाजचं सगळं सामान स्टोअर रुममध्ये नेऊन टाकलं होतं.
अरबाजने याबाबत माध्यमांशी संवाद साधताना, “मी निक्कीला भेटल्यावर या सगळ्यावर बोलेन आणि तिला खरं काय आहे ते सांगेन” असं सांगितलं होतं.
अखेर ‘बिग बॉस’च्या ( Bigg Boss Marathi ) घरातील रियुनियन पार्टीला निक्की-अरबाज एकमेकांसमोर आले. दरवाजातून आता आल्यावर अरबाज निक्कीला उचलून घेऊन थेट बेडरुम एरियामध्ये गेला आणि तो प्रचंड भावुक झाल्याचं यावेळी पाहायला मिळालं.
अरबाज निक्कीला म्हणाला, “तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? माझा साखरपुडा वगैरे काही नाही झालाय.” यावर निक्की म्हणते, “अरे मला डीपी दादा म्हणाले याची गर्लफ्रेंड आहे दुबईत… तिला मराठी वगैरे समजत नाही. जान्हवी सुद्धा मला याबद्दल म्हणाली होती. माझे आई-बाबा पण प्रचंड नाराज झाले होते. त्यांनी घरात आल्यावर अभिजीतबद्दल विचारलं होतं. आता पुरुषोत्तम दादा आले तेव्हा ते म्हणाले, तू त्यांना सांगितलंस की, १० दिवसांपासून नीट जेवला नाहीयेस…नेमकं काय झालंय?”
हेही वाचा : Grand Finale ची पहिली झलक! सूरज अन् अभिजीतचा ‘झापुक झुपूक’ म्हणत जबरदस्त डान्स; पाहा व्हिडीओ
अरबाज-निक्कीमधले गैरसमज मिटले
अरबाज निक्कीला पुढे म्हणतो, “बघ… मी तुला सांगितलं होतं ना बाहेर ‘कमिटेड’ आहे वगैरे… जे काही होतं ते सगळं मी बाहेर जाऊन संपवलेलं आहे. मी एक शो करून आता ‘बिग बॉस’मध्ये आलो होतो. त्यामुळे माझ्याबद्दल खूप अफवा पसरल्या आहेत. माझे काही असंख्य अफेअर्स वगैरे नाहीयेत. मी बाहेर जाताना पण सर्वांना सांगत होतो की, हिची ( निक्की ) काळजी घ्या. मी तुझी खूप वाट बघतोय. मी फेक वागलो असतो तर तुला ते दिसलं असतं”
अशाप्रकारे, घरात ( Bigg Boss Marathi ) आल्यावर अरबाजने त्याची बाजू निक्कीसमोर मांडली. यानंतर निक्कीने देखील त्याला माफ केल्याचं शोमध्ये पाहायला मिळालं. तसेच सध्या सोशल मीडिया माध्यमातून अरबाजने त्याच्या सर्व चाहत्यांना निक्कीला पाठिंबा द्या असं आवाहन केलं आहे.