Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात चौथ्या आठवड्याची सुरुवात भांडणाने झालेली आहे. सध्या घरात ‘सत्याचा पंचनामा’ हा टास्क सुरू आहे. या टास्कदरम्यान सदस्यांना एक-एक करून खऱ्या-खोट्याची परीक्षा देण्यासाठी बोलावलं जातं. यानंतर घरात ‘बिग बॉस’ने बनवलेल्या दोन टीम्स म्हणजे ‘ए’ व ‘बी’ टीम यावर आपलं मत नोंदवतात. सोमवारी प्रदर्शित झालेल्या भागात ‘सत्याचा पंचनामा’ करण्यासाठी आतमध्ये पहिली आर्या व नंतर घन:श्याम गेला होता. घन:श्यामच्यावेळी पहिल्यांदाच ‘बी’ टीमने खंबीरपणे आपला मुद्दा मांडला आणि त्याला शून्य रुपये बीबी करन्सी लागू करण्यात आली.

‘बी’ टीम म्हणजेच अभिजीत व त्याच्या मित्रांचा प्लॅन जान्हवी-निक्कीच्या लक्षात येताच घरात एकच गोंधळ पाहायला मिळाला होता. दोन्ही ग्रुपचे सदस्य एकमेकांशी जोरदार भांडत होते. गेल्या आठवड्यात घरात ( Bigg Boss Marathi ) डबल एविक्शन झाल्याने सध्या प्रत्येकजण नीट लक्ष देऊन आपले टास्क परफॉर्म करत आहेत.

tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Shashank Arora
“आम्ही वाळवंटात भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरजवळ…”, इरफान खान यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अभिनेता म्हणाला, “मला पतंग…”
ankita walawalkar fiance kunal express gratitude towards dhananjay powar
“दादा लग्नाला या, जोरात कानात पिळा…”, धनंजयच्या व्हिडीओवर अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची कमेंट, आभार मानत म्हणाला…
Who is Telangana Thalli?
Telangana Thalli : ‘तेलंगणा थळ्ळी’ कोण आहेत? त्यांच्या नव्या पुतळ्यावरुन नेमका वाद का पेटला आहे?
Abu Asim Azmi
Abu Azmi : “कोण विरोधक? त्यांनी आम्हाला…”; अबू आझमींचे मविआतून बाहेर पडण्याचे संकेत? आमदारकीची शपथही घेतली

हेही वाचा : “टास्कमध्ये कपडे खेचणं कितपत योग्य?” निक्की अन् जान्हवी ‘डर्टी गेम’ खेळतात; घराबाहेर येताच योगिता चव्हाणचा खुलासा

Bigg Boss Marathi : निक्की व अरबाजमध्ये वाद

आजच्या भागात ‘सत्याचा पंचनामा’ करण्यासाठी निक्की जाणार आहे. तिला ‘बिग बॉस’, “चूक झाल्यावर तुम्ही मनापासून माफी मागत नाही खरं की खोटं ?” असा प्रश्न विचारतात. निक्की म्हणते, “हे अत्यंत खोटं आहे” तिच्या या उत्तरावर अभिजीतच्या टीममधल्या सदस्यांनी असहमती दर्शवल्याने घरात एकच कल्ला होतो. निक्की बाहेर येताच अभिजीतला याबद्दल जाब विचारते. यानंतर अरबाज निक्कीवर प्रचंड संतापतो.

अरबाज निक्कीला म्हणतो, “तू भोवऱ्यासारखी फिर…” यानंतर निक्की त्याला म्हणते, “मी फिरत नाहीये समजलं ना…” पुढे, “तू त्याच्याबरोबर जा” असं अरबाज निक्कीला वैतागून रागात सांगतो. दोघेही गार्डन परिसरात आदळआपट करत असल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi

हेही वाचा : Video : लेकीला कडेवर घेत सासूसह दिल्या पोज! आलिया अन् राहा साजरं करणार रक्षाबंधन, मायलेकींचा पारंपरिक लूक चर्चेत

नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. निक्की घरात सारखी “बाईईईई…” असं म्हणताना दिसते. यानुसारच नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. “बाईईई….किती सुंदर सीन आहे”, “बाईईईईईई……किती ते नाटक हे फक्त यांनाच जमू शकतं”, “मला यांची भांडणं बघून फार बरं वाटतंय”, “हे नाटक आहे”, “फक्त नाटक आहे, निक्की लोकांचा वापर करून खेळते कोणाशीच एकनिष्ठ राहू शकत नाही” अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.

Story img Loader