Bigg Boss Marathi Arbaz Nikki Reunion : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील टॉप-६ सदस्यांना शेवटच्या दिवशी एक खास Surprise मिळणार आहे. ‘बिग बॉस’च्या प्रत्येक सीझनला शेवटच्या दिवशी घरात सुरुवातीपासून सहभागी झालेल्या सदस्यांना रिएन्ट्री देतात. यंदा हा शो २८ जुलैला सुरू झाला होता तेव्हा या घरात एकूण १६ सदस्यांनी एन्ट्री घेतली होती. यापैकी आता फक्त टॉप- ६ सदस्य या घरात बाकी राहिले आहेत. यांचं आणि खेळात सहभागी झालेल्या जुन्या स्पर्धकांचं आजच्या भागात रियुनियन होणार आहे.
प्रेक्षकांना सर्वात जास्त उत्सुकता आहे ती अरबाज-निक्कीच्या भेटीची…याचं कारण म्हणजे, अरबाज आठव्या आठवड्याच एलिमिनेट झाल्यावर निक्की ढसाढसा रडली होती. यानंतर घरात ‘फॅमिली वीक’ टास्क पार पडला. यावेळी घरात निक्कीचे आई-वडील आले होते. प्रमिला तांबोळी यांनी घरात आल्यावर अरबाजबद्दल लेकीसमोर अनेक धक्कादायक खुलासे केले. यामुळेच निक्कीने अरबाजबरोबरचं नातं संपल्याचं जाहीर केलं.
हेही वाचा : अरबाज पुन्हा आला! निक्की थेट विचारणार जाब, Bigg Boss च्या घरात शेवटच्या दिवशी मोठा ट्विस्ट
अरबाजने यावर निक्कीशी प्रत्यक्ष भेटून चर्चा करेन अशी प्रतिक्रिया दिली होती. अखेर या दोघांची ‘बिग बॉस’च्या घरात भेट झाली आहे. यावेळी अरबाजने निक्कीसमोर अनेक गोष्टींबाबत स्पष्टीकरण दिलं. तर, निक्की म्हणाली, “तू जाताना रडला नाही, मला वाटलं खरंच तुझं बाहेर लफडं असेल म्हणून तुला फरक नाही पडला” आता निक्कीच्या प्रश्नांची अरबाज काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
अरबाजच्या कोटवरील ‘त्या’ नावाने वेधलं लक्ष
दरम्यान, घरात ( Bigg Boss Marathi ) एन्ट्री घेतल्यावर अरबाजच्या कोटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्याच्या कोटवर ‘बाई’ नाव लिहिलेला बॅच लावण्यात आला आहे. निक्की पहिल्या दिवसापासून घरात “बाई हा काय प्रकार…” हा डायलॉग म्हणत होती. त्यामुळे सध्या निक्कीचं ‘बाईSSS’ सर्वत्र लोकप्रिय झालं आहे. त्यामुळेच अरबाजने हा नाव लिहिलेला बॅच लावून घरात एन्ट्री घेतली आहे.
हेही वाचा : ‘बिग बॉस मराठी’ने रचला इतिहास! शेवटच्या आठवड्यात रेकॉर्डब्रेक TRP; ‘कलर्स मराठी’ने शेअर केली खास पोस्ट
आता अरबाज निक्की माफ करणार की, दोघांचं नातं संपणार हे आजच्या भागात स्पष्ट होईल. दरम्यान, रविवारी ६ ऑक्टोबरला ‘बिग बॉस मराठी’चा ( Bigg Boss Marathi ) ग्रँड फिनाले पार पडणार आहे. आता अभिजीत, अंकिता, सूरज, निक्की, धनंजय आणि जान्हवी या सहा जणांमध्ये ट्रॉफीवर कोण नाव कोरणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.