Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून नुकताच अरबाज पटेलचा प्रवास संपला आहे. खेळाच्या आठव्या आठवड्यात कमी मतं मिळाल्याने तो ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून एलिमिनेट झाला. गेल्या आठवड्यात वर्षा, सूरज, जान्हवी, निक्की आणि अरबाज असे पाच सदस्य नॉमिनेट होते. यांच्यापैकी घराचा निरोप कोण घेणार याबद्दल गेली आठवडाभर चर्चा सुरू होती. अखेर अरबाजने घरातून एक्झिट घेतली आहे.

अरबाज पटेल एलिमिनेट झाल्यावर निक्की प्रचंड भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. ‘बिग बॉस’ने एलिमिनेशन जाहीर करताच निक्की घरात मोठमोठ्याने रडत होती. एवढंच नव्हे तर तिने ‘बिग बॉस’ला, “अरबाजला वाचवा… त्याला एक संधी द्या, अभिजीत तू तरी बिग बॉसशी एकदा बोल” अशी विनवणी केली. मात्र, खेळाच्या नियमानुसार अरबाजला घराबाहेर पडावं लागलं आहे.

When Devendra Fadnavis becomes Chief Minister conspiracy is hatched to create communal tension says Amar Sable
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
loksatta readers response
लोकमानस : हे केवळ चुकांवर पांघरूण
Sonu Nigam
सोनू निगम कार्यक्रम सोडून गेलेल्या नेत्यांवर नाराज; म्हणाला, “हा सरस्वतीचा अपमान…”
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Shashank Arora
“आम्ही वाळवंटात भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरजवळ…”, इरफान खान यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अभिनेता म्हणाला, “मला पतंग…”
ankita walawalkar fiance kunal express gratitude towards dhananjay powar
“दादा लग्नाला या, जोरात कानात पिळा…”, धनंजयच्या व्हिडीओवर अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची कमेंट, आभार मानत म्हणाला…
Nana Patole Speech About Rahul Narwekar ?
Nana Patole : नाना पटोलेंचं वक्तव्य; “राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन, मात्र २०८ मतांनी मी निवडून आलो म्हणून टिंगल..”

हेही वाचा : Quiz : निक्की तांबोळी ते ‘गुलीगत’ फेम सूरज चव्हाण; Bigg Boss Marathi 5 बद्दल तुम्हाला किती माहिती आहे? सोडवा ‘हे’ १० प्रश्न

पहिल्या दिवसापासून प्रेक्षक ‘ए टीम’च्या विरोधात होते. त्यामुळे यावेळी अरबाजला घराचा निरोप घ्यावा लागेल याची शक्यता यापूर्वीच वर्तवण्यात येत होती. अगदी नॉमिनेशन टास्क झाल्यावर अभिजीतने सुद्धा अरबाज बाहेर जाईल असं म्हटलं होतं. निक्कीने घरातील अन्य सदस्यांना प्रचंड त्रास दिल्याचं हा संपूर्ण सीझन पाहायला मिळालं. मात्र, या सगळ्यात अरबाजने तिला कायम डोळे झाकून साथ दिल्याने याचा परिणाम त्याच्या खेळावर झाला. आज अरबाज घराबाहेर झाल्याने नेटकऱ्यांसह ‘बिग बॉस मराठी’च्या प्रेक्षकांनी ‘कलर्स मराठी’ने शेअर केलेल्या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

हेही वाचा : “बिग बॉस ७० दिवसांतच गुंडाळणार…”, तृप्ती देसाईंचा पोस्ट शेअर करत प्रेक्षकांना सवाल; म्हणाल्या…

अरबाज घराबाहेर झाल्यावर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस

“अरबाजला बाहेर काढून बिग बॉसने निक्कीला गुलीगत धोका दिला…आता बोल बाई काय हा प्रकार”, “याला घरातून बाहेर काढल्याबद्दल बिग बॉसला २ किलो बासमती तांदूळ”, “अख्खा महाराष्ट्र आज आनंदी झाला आहे”, “आज सुखाने झोप लागेल”, “उद्याच्या एपिसोडमध्ये एकट्या निक्कीला पाहायचंय”, “निक्कीला बरोबर घेऊन जायचं ना” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी अरबाज एलिमिनेट झाल्याच्या पोस्टवर केल्या आहेत.

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi : अरबाज एलिमिनेट झाल्याच्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स

दरम्यान, काही नेटकऱ्यांनी अरबाज खरंच चांगला खेळाडू होता मात्र, निक्कीमुळे त्याचा खेळ दिसू शकला नाही असं देखील म्हटलं आहे. आता निक्की अरबाजशिवाय घरात ( Bigg Boss Marathi ) कशी खेळ खेळणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Story img Loader