Bigg Boss Marathi Grand Finale : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. यंदाच्या सीझनचा महाअंतिम सोहळा ६ ऑक्टोबरला पार पडणार आहे. हे पर्व संपण्यासाठी आता अवघे दोन दिवस बाकी राहिले असताना घरात एक मोठा ट्विस्ट येणार आहे. हा ट्विस्ट नेमका काय आहे जाणून घेऊयात…

भांडणं, वादविवाद, विविध टास्क अशा बऱ्याच गोष्टींमुळे यंदाचा सीझन गाजला. मात्र, सर्वाधिक चर्चा झाली ती अरबाज-निक्कीच्या मैत्रीची. २८ जुलैला ‘बिग बॉस’ सुरू झाल्यापासून पहिल्याच आठड्यात अरबाज-निक्कीच्या प्रेमाचे वारे घरात वाहू लागले होते. यानंतर मध्यंतरीच्या काळात दोघांमध्ये वाद होऊन अरबाज बाहेरील आयुष्यात ‘कमिटेड’ असल्याचं त्याने शोमध्ये मान्य केलं होतं. कालांतराने शोमध्ये निक्की-अरबाजमधील वाद मिटले आणि दोघांमधील जवळीक वाढली. अशातच आठव्या आठवड्यात अरबाजने घरातून एक्झिट घेतली. यामुळे निक्की प्रचंड भावुक झाली होती.

Bigg Boss 18 Fame Rajat Dalal talk about chahat pandey and controversy
Video: चाहत पांडेचं नाव ऐकताच रजत दलालने जोडले हात, विनंती करत म्हणाला…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Bigg Boss 18 Chum Darang Talking In Marathi Language Video Viral
Bigg Boss 18: “खूप छान…”, चुम दरांगने मराठीत साधला संवाद, विवियन डिसेनाच्या सक्सेस पार्टीबद्दल म्हणाली…
Bigg Boss 18 Vivian dsena apologises to fans in first post after grand Finale
Bigg Boss 18: “मला माफ करा…”, विवियन डिसेनाची ‘ती’ पोस्ट व्हायरल; म्हणाला, “मी खूप भावुक झालोय…”
vivian dsena first reaction after karenveer mehra won bigg boss 18
करणवीर मेहरा Bigg Boss 18 चा विजेता ठरल्यावर विवियन डिसेनाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, “त्याच्या…”
Bigg Boss 18 Grand Finale Winner Karanveer Mehra
Bigg Boss 18 Winner : ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा विजेता ठरला करणवीर मेहरा
Bigg Boss 18 Vivian Dsena angry on karan veer Mehra roasting
Bigg Boss 18: दोन वर्षांच्या मुलीवरून खिल्ली उडवल्यामुळे विवियन डिसेना भडकला करणवीर मेहरावर, रागातच्या भरात केलं ‘हे’ कृत्य
Bigg Boss 18 Grand Finale Karan Veer Mehra Vivian Dsena Perform with Shilpa shirodkar
Bigg Boss 18: “ये बंधन तो…”, करण-विवियनचा शिल्पासह जबरदस्त परफॉर्मन्स, बहीण नम्रता शिरोडकर म्हणाली…

हेही वाचा : ‘बिग बॉस मराठी’ने रचला इतिहास! शेवटच्या आठवड्यात रेकॉर्डब्रेक TRP; ‘कलर्स मराठी’ने शेअर केली खास पोस्ट

अरबाज घराबाहेर गेल्यावर फॅमिली वीकमध्ये घरात निक्कीचे आई-बाबा तिला भेटण्यासाठी आले होते. यावेळी प्रमिला तांबोळी यांनी लेकीसमोर अरबाजबद्दल धक्कादायक खुलासे केले. त्यांनी निक्कीला अरबाजचा साखरपुडा झाल्याचं कानावर आलंय असंही सांगितलं. यामुळे निक्कीने अरबाजचं सर्व सामान घराबाहेर स्टोअर रुममध्ये आणून फेकलं होतं. तसेच यापुढे त्याच्याशी संबंध ठेवणार नाही असंही कॅमेऱ्यासमोर सांगितलं होतं. यावेळी अरबाजने माध्यमांना, “माझा साखरपुडा झालेला नाही. निक्की शो संपल्यावर घराबाहेर आली की, मी तिच्यासमोर सगळ्या गोष्टी स्पष्ट करून सांगेन” असं सांगितलं होतं.

अरबाज पुन्हा आला Bigg Boss Marathi च्या घरात

अखेर ग्रँड फिनालेला एक दिवस बाकी राहिलेला असताना म्हणजेच शेवटच्या दिवशी अरबाजने घरात पुन्हा एकदा एन्ट्री घेतली आहे. घरात शेवटच्या दिवशी संपूर्ण सीझनमध्ये सहभागी झालेले सगळे सदस्य रिएन्ट्री घेतात. वैभव, इरिना यांच्यासह अरबाजदेखील घरात पुन्हा आल्याचं नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi 5 चा विजेता ठरवण्यासाठी आवडत्या स्पर्धकाला वोट कसे करायचे? जाणून घ्या

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi : अरबाज पुन्हा आला घरात

अरबाजला पाहताच निक्कीचा चेहरा पडतो…दोघंही बेडरुम एरियामध्ये हातात हात घेऊन एकमेकांशी संवाद साधत असतात. यावेळी निक्की त्याला आईने सांगितलेल्या सगळ्या गोष्टींचा जाब विचारते आता अरबाज यावर काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Story img Loader