Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात कॅप्टनीसाठी निक्की, अरबाज, जान्हवी, सूरज, निखिल, घन:श्याम आणि योगिता या स्पर्धकांमध्ये टास्क खेळवण्यात आला. ज्या स्पर्धकाकडे खेळाच्या अंतिम फेरीत सर्वात जास्त फ्रेंच फ्राइस असतील तो सदस्य या आठवड्यात कॅप्टन होणार होता. निक्कीच्या टीममधील एकूण चार स्पर्धक कॅप्टन्सीचे दावेदार होते त्यामुळे साहजिकच त्यांनी ग्रुप करून हा टास्क खेळला आणि अंतिम फेरीपर्यंत निखिल, योगिता, सूरज असे सगळे प्रतिस्पर्धी खेळाडू बाद होऊन अरबाज या आठवड्यात घराचा कॅप्टन झाला.

अरबाज कॅप्टन झाल्यावर जान्हवी आणि निक्की प्रचंड आनंदी झाल्या होत्या. अंतिम फेरीत स्वत:कडच्या फ्रेंच फ्राइस अरबाजच्या बॉक्समध्ये टाकत या दोन मैत्रिणींनी ठरवल्याप्रमाणे अरबाजला विजयी केलं. यानंतर अरबाजने कॅप्टन रुमचा ताबा घेतला. आपल्या मित्रांशी संवाद साधताना तो म्हणाला, “या आठवड्यात आपला ग्रुप एकही टास्क हरलेला नाही त्यामुळे असेच खेळू आणि प्रत्येकाने कॅप्टन व्हायचंय एवढं लक्षात ठेवा.”

social security schemes are not free gifts jharkhand speaker mahato
उद्योगपतींना पायघड्या घालताना ‘रेवडी’चा विषय नाही
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
कोण आहेत प्रताप सरनाईक; मुख्यमंत्र्यांनी शिवसेना शिंदे गटाचे पंख छाटले का? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : मुख्यमंत्र्यांची शिंदे गटावर कुरघोडी? कोण आहेत प्रताप सरनाईक?
karan veer mehra second wife Nidhi Seth talks about husband sandip kumar
अभिनेत्यापासून घटस्फोट घेतल्यावर प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं दुसरं लग्न, पतीबद्दल म्हणाली, “तो खूपच…”
Colors Marathi Bigg Boss Marathi season 5 will be re-broadcasted
Bigg Boss Marathi 5: पुन्हा एकदा तोच राडा अन् ‘भाऊचा धक्का’ पाहायला मिळणार; तारीख, वेळ जाणून घ्या…
Shilpa Shirodkar
शिल्पा शिरोडकर ‘बिग बॉस १८’मध्ये गेल्यावर महेश बाबूने पाठिंबा का दिला नाही? अभिनेत्री म्हणाली, “त्यांना गर्विष्ठ…”
Farah Khan
“शाहरुख कुठे उभा राहील?” शिल्पा शिरोडकरच्या वजनावर फराह खानने केलेली कमेंट; अभिनेत्री म्हणाली…
Bigg Boss 18 Fame Rajat Dalal talk about chahat pandey and controversy
Video: चाहत पांडेचं नाव ऐकताच रजत दलालने जोडले हात, विनंती करत म्हणाला…

अरबाज कॅप्टन झाल्यावर दुसरीकडे अंकिता आपल्या मित्रमंडळींशी संवाद साधताना, “केवळ आपल्या टीमने साफसफाईची कामं करायची नाहीत…किचनमध्ये सुद्धा ड्युटी घ्यायची” असा निर्णय सांगते. आता येत्या काळात अरबाज घराचा ( Bigg Boss Marathi ) ताबा कसा सांभाळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा : 70th National Film Awards : राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये ‘वाळवी’ने मारली बाजी! तर सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला…; पाहा विजेत्यांची यादी

सूरजचं होतंय कौतुक

कॅप्टनसी कार्यात अरबाज विजयी झाला असला तरीही जनतेने पूर्णत: बहुमताने सूरज चव्हाणचं कौतुक केलं आहे. सूरजने टास्कमध्ये ज्याप्रकारे अरबाज-जान्हवी-निक्की या त्रिकुटाला टक्कर दिली ती खरंच बघण्याजोगी होती असं मत अनेक कलाकारांसह नेटकऱ्यांनी कमेंट्स सेक्शनमध्ये मांडलं आहे. तर, घरात वर्षा उसगांवकरांनी सुद्धा चांगल्या खेळीबद्दल सूरजचं कौतुक केलं आहे.

हेही वाचा : “शिवाली हे खरंय…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत; सोबतीला श्रमेशला पाहून नेटकरी म्हणाले…

हेही वाचा : Video : …अन् सगळे सदस्य ढसाढसा रडले! ‘बिग बॉस’च्या घरात भावनिक संवाद; नेटकरी म्हणाले, “सूरजला पाहून खूप…”

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi : निखिल दामले, सूरज चव्हाण

अरबाज कॅप्टन झाल्याच्या निर्णयावर नेटकरी म्हणतात, “खरा कॅप्टन सूरज असला असता पण, यांनी गट केला.”, “सूरजला जान्हवी आणि निक्की अत्यंत वाईट शिव्या दिल्यात त्यावेळी शो म्युट का केला होता?”, “सूरजमुळे ‘बिग बॉस’चा ( Bigg Boss Marathi ) टीआरपी आहे”, “फक्त सूरजला व्होट करा”, “अरबाजने कॅप्टनशिप जिंकली पण सूरजने दिल जित लिया…”, “चुलीत घाला असल्या कॅप्टनला, जोपर्यंत अरबाज कॅप्टन आहे तो पर्यंत बिग बॉस बघणं बंद” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून आल्या आहेत.

Story img Loader