Bigg Boss Marathi Arbaz Patel : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व सध्या चांगलंच चर्चेत आहे. सध्या अरबाज पटेलच्या खेळाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. प्रत्येक टास्कमध्ये अरबाजच्या ताकदीसमोर कोणाचाच निभाव लागत नाही आहे. अगदी घरात वाइल्ड एन्ट्री घेऊन आलेल्या प्रसिद्ध बॉडीबिल्डर संग्राम चौगुलेला देखील अरबाज जोरदार टक्कर देत असल्याचं पाहायला मिळत आहे. उत्कर्ष शिंदे, कपिल होनराव अशा मराठी कलाकारांनी पोस्ट शेअर करत अरबाजच्या ताकदीचं आणि त्याच्या खेळाचं कौतुक केलं आहे.

अरबाज पटेल ‘Splitsvilla’ या शोमुळे प्रसिद्धीच्या झोतात आला होता. यानंतर ‘बिग बॉस’च्या घरात सहभागी झाल्याने अरबाजचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात वाढला. मात्र, पहिल्या दिवसापासून तो निक्कीच्या साथीने हा खेळ खेळत असल्याचं पाहायला मिळत आहे. पहिल्याच आठवड्यात या दोघांच्या प्रेमाचे वारे घरात वाहू लागले होते. याशिवाय निक्कीची सर्व कामं देखील अरबाज ऐकतो. यामुळे रितेश देशमुखने सुद्धा भाऊच्या धक्क्यावर अरबाजची कानउघडणी केली होती. याबाबत आता अरबाजच्या आई फरीदा यांनी ‘अल्ट्रा बझ मराठी’ या युट्यूब वाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे.

Milind Gawali
मिलिंद गवळींनी पत्नीबद्दल सांगितला लग्नानंतरचा भन्नाट किस्सा; म्हणाले, “सात फेरे झाल्यानंतर…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Nana Patole on Ravindra Dhangekar
Nana Patole: रवींद्र धंगेकर काँग्रेसचा हात सोडणार? प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, “काही लोक व्यावसायिक…”
Komal More
“शत्रूला पोत्यात भरून…”, ‘लाखात एक आमचा दादा’मधील तेजूच्या व्हिडीओवर नेटकऱ्याची कमेंट, अभिनेत्री उत्तर देत म्हणाली…
Pankaja Munde on Dhananjay Munde
“धनंजय मुंडे फडणवीस-पवारांचे खास, राजीनामा मागणार नाहीत”, क्षीरसागरांच्या दाव्यावर पंकजा मुंडेंचं दोन वाक्यात उत्तर; म्हणाल्या…
Meera Jaggnath
ज्याच्यासाठी साखरपुडा मोडला तो मुलगाच…; ‘ठरलं तर मग’फेम मीरा जगन्नाथने केला खुलासा; म्हणाली, “सहा महिन्यांनी…”
Fatima Sana Shaikh News
Fatima Sana Shaikh : फातिमा सना शेखने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव; “तो माणूस मला म्हणाला, तुला…”
Tejshree Pradhan
“जे हक्काचे…”, तेजश्री प्रधान ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यावर काय करतेय? म्हणाली, “आताच्या घडीला…”

हेही वाचा : Bigg Boss Marathi : Video : “अरे मध्ये नको बोलूस…”, पंढरीनाथ सूरजवर भडकला, अंकिताने मध्यस्थी केली पण…; प्रोमो पाहून काय म्हणाले नेटकरी?

अरबाजच्या आई काय म्हणाल्या?

अरबाज आणि निक्कीची जवळीक पाहून अनेकदा प्रेक्षक त्यांना ट्रोल करतात. यावर अरबाजच्या आई फरीदा काय म्हणाल्या आहेत पाहूयात, त्या सांगतात, “अरबाज ‘बिग बॉस’मध्ये गेला, तो टीव्हीवर दिसतोय हे पाहून मला प्रचंड आनंद होतो. त्याचा सुरुवातीचा गेम मला खूप आवडायचा पण, निक्कीशी असलेली त्याची जवळीक मला आवडत नाहीये. कारण, माझा मुलगा असा नाहीये…पण, तेच टीव्हीवर दिसतंय त्यामुळे लोकांना सुद्धा या गोष्टी आवडत नाहीयेत. त्याने निक्कीबरोबर खेळावं पण, तिच्यापासून दूर राहावं एवढंच मला वाटतं.”

“माझा मुलगा आता जसा टीव्हीवर दिसतोय तसा अजिबात नाहीये. त्याचा स्वभाव खूप चांगला आहे. आमच्या घरात तो सर्वांशी खूप चांगला वागतो. पण, टीव्हीवर जे दिसतंय त्यामुळे कोणालाच त्याचं वागणं पटत नाहीये. खऱ्या आयुष्यात त्याचं वागणं फार वेगळंय भावा-बहि‍णींची काळजी घेणं. त्याचे बाबा त्याला काही बोलले की, तो मान खाली घालून ऐकतो. ” असं मत अरबाजच्या आईने मांडलं आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi – Video : “जान्हवी तुझे डोळे किती सुंदर आहेत”, अरबाज ‘ते’ विधान ऐकताच निक्की म्हणाली, “बाई मी खूप…”

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi

अरबाजचा लहान भाऊ अरमान भावाबद्दल म्हणतो, “माझा भाऊ टीव्हीवर दिसतोय ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. जेव्हा त्याने घरात माझी आठवण काढली… ती गोष्ट माझ्यासाठी खूप खास होती. त्याने असंच चांगलं खेळून अंतिम फेरीपर्यंत पोहोचलं पाहिजे.”

दरम्यान, आता या आठवड्यात घरातून बेघर होण्याच्या प्रक्रियेसाठी एकूण ५ सदस्य नॉमिनेट झाले आहेत. यामध्ये निक्की, वर्षा, जान्हवी, सूरज आणि अरबाज या सदस्यांचा समावेश आहे. आता यांच्यात कोण बाहेर जाणार आणि कोण घरात राहून नवव्या आठवड्यात प्रवेश करणार हे वीकेंडला भाऊच्या धक्क्यावर स्पष्ट केलं जाणार आहे.

Story img Loader