Bigg Boss Marathi Arbaz Patel : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून आठव्या आठवड्यात अरबाज पटेलची एक्झिट झाली. घरात नॉमिनेट असलेल्या इतर सदस्यांच्या तुलनेत त्याला प्रेक्षकांची कमी मतं मिळाल्याने अरबाजचा खेळातील प्रवास संपला आणि त्याला घराचा निरोप घ्यावा लागला. अरबाज ‘बिग बॉस’चा खेळ पहिल्या दिवसापासून निक्कीबरोबर खेळत होता. त्यामुळे जवळचा मित्र घरातून बाहेर पडताना निक्की प्रचंड भावुक झाली होती.

अरबाज पटेल घराबाहेर होणार अशी घोषणा होताच निक्की ढसाढसा रडत होती. “त्याला बाहेर काढू नका” अशी विनंती तिने शेवटपर्यंत ‘बिग बॉस’ला केली. मात्र, नियमांनुसार त्याला बाहेर पडावं लागलं. ‘बिग बॉस’च्या घरात अरबाजने अनेकदा ‘मी कमिटेड आहे’ आहे असं म्हटलं होतं. त्यामुळे निक्की आणि त्याचं नातं केवळ शोपुरतं मर्यादित आहे का? अशा स्वरुपाचे प्रश्न त्याला पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा विचारण्यात आले होते. या सगळ्यावर अरबाजने ‘नाही’ असं उत्तर दिलं होतं. आता अरबाज वैयक्तिक आयुष्यात काय करणार याकडे त्याच्या चाहत्यांचं लक्ष असेलच मात्र, यापूर्वी त्याने घराबाहेर आल्यावर निक्कीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : १०० नव्हे तर फक्त ७० दिवसांत संपणार पाचवा सीझन! ‘या’ दिवशी असेल ग्रँड फिनाले, जाणून घ्या

‘बिग बॉस’चा महाअंतिम सोहळा पार पडण्यासाठी आता अवघे १२ दिवस बाकी राहिले आहेत. त्यामुळे नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात ‘बिग बॉस’ने या आठवड्यात घरात बाकी राहिलेल्या सगळ्या ८ सदस्यांना नॉमिनेट केलं आहे. सगळे सदस्य नॉमिनेट झाल्याने यात निक्कीचा देखील समावेश आहे.

अरबाजने प्रेक्षकांना केली विनंती

प्रेक्षकांनी नॉमिनेट असलेल्या निक्कीला भरभरून व्होट ( Bigg Boss Marathi ) द्यावेत यासाठी अरबाजने पोस्ट शेअर केली आहे. तो म्हणतो, “व्होटिंगला सुरुवात झाली आहे. निक्की तांबोळीला ‘बिग बॉस मराठी’ची विजेती बनवण्यासाठी प्लीज व्होट करा.” या पोस्टमध्ये अरबाजने निक्कीला टॅग देखील केलं आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : घरातील सगळे ८ सदस्य झाले Nominate! ‘बिग बॉस’ने दिला मोठा धक्का, काय आहे कारण?

Bigg Boss Marathi : अरबाजची निक्कीसाठी पोस्ट

दरम्यान, घराबाहेर आल्यावर सुद्धा अरबाजने निक्की जिंकावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. तसेच बाहेर आल्यावर देखील आमची मैत्री कायम असेल असं अरबाज घरात पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणाला होता.