Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या आठवड्याचा भाऊचा धक्का नुकताच पार पडला. यावेळी रितेश देशमुखने जान्हवी, निक्की, वैभव, अरबाज, घन:श्याम या सदस्यांची शाळा घेतल्याचं पाहायला मिळालं. याशिवाय या आठवड्याच्या भाऊच्या धक्क्यावर खास पाहुण्यांनी उपस्थिती लावली होती.

‘कलर्स मराठी’ वाहिनीवर २६ ऑगस्टपासून ‘दुर्गा’ ही मालिका सुरू होत आहे. यामध्ये प्रमुख भूमिका साकारणारे कलाकार वीकेंडला ‘बिग बॉस’च्या घरात गेले होते. रुमानी खरे, शिल्पा नवलकर, अंबर गणपुळे या तिघांनीही घरातल्या सदस्यांबरोबर एक खास टास्क खेळला. दुर्गाने यावेळी घरातल्या पुरुष सदस्यांबरोबर रॅपिड फायर राऊंड घेत अनेक प्रश्न विचारले. यातील काही प्रश्न ऐकून अनेकजण बुचकळ्यात पडले होते. याच रॅपिड फायर राऊंडदरम्यान अरबाजच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा झाला आहे.

Rajesh Khanna, sanjeev kumar
राजेश खन्नांपेक्षा शत्रुघ्न सिन्हा, संजीव कुमार वाईट होते, असं का म्हणाल्या शबाना आझमी?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
najma heptulla on indira gandhi emergency
Indira Gandhi: “इंदिरा गांधींना आणीबाणीचा पश्चात्ताप होत होता”, नजमा हेपतुल्ला यांचा आत्मचरित्रात दावा; विश्वासू व्यक्तींबाबतही होती तक्रार!
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!
ankita walawalkar fiance kunal express gratitude towards dhananjay powar
“दादा लग्नाला या, जोरात कानात पिळा…”, धनंजयच्या व्हिडीओवर अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची कमेंट, आभार मानत म्हणाला…
suraj chavan meet dcm ajit pawar
“देवमाणूस आहेत दादा…”, अजित पवार उपमुख्यमंत्री होताच सूरज चव्हाण पोहोचला मंत्रालयात! नव्या घराबद्दल म्हणाला…
Loksatta lalkilla Amit Shah statement of Congress defeat
लालकिल्ला: अमित शहांचे काँग्रेस पराभवाचे सत्यकथन!
Amiatbh Bachchan And Rekha
रेखा यांनी सांगितला अमिताभ बच्चन यांच्याबरोबर ‘सुहाग’ या चित्रपटात काम करण्याचा अनुभव, म्हणाल्या, “ज्यांच्याबरोबर मी…”

हेही वाचा : Bigg Boss Marathi : इरिना झाली Eliminate! अरबाज-वैभवला अश्रू अनावर; सल्ला देत म्हणाली, “तुम्ही सगळे…”

Bigg Boss Marathi : अरबाज ‘सिंगल’ नव्हे तर ‘कमिटेड’

दुर्गा अरबाजला प्रश्न विचारते. यातला पहिला प्रश्न असतो, “या घरात तुम्हाला सर्वात जास्त काय महत्त्वाचं वाटतं? प्रेम की गेम?” यावर अरबाज म्हणाला, “गेम कारण, प्रेम करून बघितलं पण, ते गेमसारखंच वाटतंय त्यामुळे आता मला गेम महत्त्वाचा आहे.” यानंतर दुर्गा दुसरा प्रश्न विचारत अरबाजला सांगते, “सध्या संपूर्ण महाराष्ट्राला हा प्रश्न पडलाय आणि याचं खरं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. तुम्ही सिंगल आहात की कमिटेड?” यावर अरबाज जराही वेळ न घालवता ‘कमिटेड’ असं सांगतो.

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi : घरातील सदस्यांना दुर्गाने विचारले प्रश्न ( फोटो सौजन्य : कलर्स मराठी वाहिनी )

अरबाज आणि निक्कीमध्ये प्रेम फुलतंय असं एवढे दिवस प्रेक्षकांना ‘बिग बॉस मराठी’चे प्रोमो व एकंदर शो पाहून वाटत होतं. तशा चर्चा देखील सर्वत्र रंगल्या आहेत. याशिवाय घरात अरबाजने निक्कीसाठी टोमॅटोचं हृदय बनवणं, पहिल्याच आठवड्यात घन:श्यामने तिला वहिनी हाक मारणं, अरबाजने कॅप्टन्सीवर पाणी सोडत निक्कीला कॅप्टन बनवणं, बीबी करन्सी वापरून निक्कीला सेफ करणं अशा बऱ्याच गोष्टी केल्या आहेत. यामुळेच अरबाजने ‘कमिटेड’ असं उत्तर दिल्याने बऱ्याच लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

खरंतर, अरबाजच्या रिलेशिपचा वाद हा Splitsvilla 15 पासून सुरू आहे. शोमध्ये अरबाजचं नायराबरोबर कनेक्शन होतं. मात्र, हा शो संपल्यावर त्याने खऱ्या आयुष्यातील प्रेमाची कबुली दिली. यानंतर नायराने त्याच्यावर अनेक आरोप केले होते. तर, आता ‘बिग बॉस मराठी’चे प्रेक्षक निक्की-अरबाजच्या नात्याबाबत चर्चा करत असतानाच त्याने या रॅपिड फायर राऊंडमध्ये ‘कमिटेड’ असल्याचं सांगितलं आहे. याबाबत त्याने सखोल स्पष्टीकरण दिलेलं नाही. मात्र, शोमध्ये सहभागी होण्यापूर्वी अरबाजने त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील नात्याबाबत खुलासा केला होता.

सध्या मी रिलेशनशिपमध्ये आहे – अरबाज पटेल

अरबाजने ‘बिग बॉस मराठी’च्या घरात प्रवेश घेण्याआधी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला मुलाखत दिली होती. यामध्ये त्याने लीझा बिंद्राबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगितलं होतं. “सध्या मी रिलेशनशिपमध्ये आहे. तिच्याबरोबर मी सोशल मीडिया संदर्भातील कंटेट बनवायचो. तिचं नाव लीझा आहे. आम्ही दोघंही एकत्र खूप छान दिसतो. आमची उंची सुद्धा एकमेकांना साजेशी अशी आहे. अजून खूप आयुष्य बाकी आहे आणि बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत. काहीजण म्हणतात माझं लग्न झालं आहे पण, असं नाहीये. आपण सोशल मीडिया वापरतो. त्यामुळे माझ्याबद्दलची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यात माझ्या चाहत्यांना रस असतो. जेव्हा माझं लग्न होईल तेव्हा मी त्या सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर सांगेन. पण, सध्या माझं लग्न झालेलं नाही.” असं अरबाजने स्पष्ट केलं होतं.

हेही वाचा : Video : “ग्रुप A ला ट्रॉफी उचलू देणार नाही…”, चुगली ऐकताच निक्की भडकली! पण, नेटकऱ्यांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया

“लोकांचा प्रेम आणि आशीर्वाद असेल, तर लवकरच लग्न करू. मी रिलेशनशिपमध्ये आहे पण, आमचं लग्न झालेलं नाही. लवकरच लग्न करू… सध्या मी करिअरकडे लक्ष देत आहे.” असं अरबाजने या मुलाखतीत सांगितलं होतं.

आता रॅपिड फायर राऊंडमध्ये कमिटेड उत्तर दिल्यावर अरबाज-निक्कीच्या मैत्रीवर याचा कसा परिणाम होणार? निक्कीने सांगितल्याप्रमाणे तिने खरंच ‘ए’ ग्रुप सोडलाय का? या सगळ्या गोष्टी ‘बिग बॉस मराठी’च्या ( Bigg Boss Marathi ) घरात आगामी भागांमध्ये पाहायला मिळतील.

Story img Loader