Bigg Boss Marathi Captain Arbaz Patel : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आठव्या आठवड्याचा कॅप्टन होण्याचा बहुमान अरबाज पटेलला मिळाला आहे. त्यामुळे यंदाच्या पर्वात दोन वेळा कॅप्टन बनण्याची संधी अरबाजला मिळाली आहे. ‘कोणाचं गोड पाणी कोणाची तहान भागवणार?’ हे अनोखं कॅप्टन्सी कार्य घरात पार पडलं. निक्कीने पहिल्याच डावापासून हा संपूर्ण गेम फिरवल्याचं पाहायला मिळालं. या टास्कमध्ये नेमकं काय घडलं जाणून घेऊयात…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस’च्या घरात आठव्या आठवड्याच्या कॅप्टन्सीसाठी वर्षा, सूरज, अरबाज आणि धनंजय असे चार दावेदार होते. या सदस्यांच्या समोर ‘बिग बॉस’ पाण्याने भरलेले डबे ठेवले होते. अंकिता, पॅडी, निक्की आणि जान्हवी या चार सदस्यांना पळत जाऊन बझर वाजवायचा होता. जो सदस्य आधी बझर वाजवणार तो एक ग्लास पाण्याचे दर ठरवणार होता आणि कार्याच्या अंतिम फेरीत ज्याच्याकडे सर्वाधिक बीबी करन्सी असेल तो सदस्य विजयी होणार होता.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : “मला ‘अरबाज-२’, ‘बैल’ अशी नावं पाडली, पण आता…”, घराबाहेर आल्यावर वैभवचा निर्धार; म्हणाला, “ट्रॉफी बारामतीत…”

Bigg Boss Marathi : निक्कीने बाजी पालटली

पहिल्या डावातच निक्कीने बझर वाजवून संपूर्ण गेम फिरवला. निक्कीने अरबाजच्या एका ग्लासची किंमत पाचशे रुपये ठेवली. तर, वर्षा, सूरज आणि धनंजय यांच्या पाण्याच्या ग्लासची किंमत अनुक्रमे ३००, २०० आणि शंभर रुपये एवढी ठेवली. त्यामुळे साहजिकच अरबाजने पहिल्याच डावात एकूण ४ हजार करन्सी मिळवत या टास्कमध्ये लीड घेतली होती.

दुसऱ्या डावात सुद्धा निक्कीनेच बझर वाजवला. यावेळी अरबाजच्या ग्लासची किंमत ३००, वर्षा यांच्या २०० तर, धनंजयच्या ग्लाची किंमत शंभर ठेवण्यात आली. या दुसऱ्या फेरीत पॅडी-अंकिताने जबरदस्त खेळ दाखवला. एकूण १४ ग्लास पाणी दोघेही प्यायले. पण, जान्हवीने वर्षा यांना पुढे आणल्याने धनंजय या फेरीत बाद झाला. कॅप्टन्सी टास्कची अंतिम फेरी वर्षा आणि अरबाज यांच्यात रंगली. यावेळी निक्कीने आधीच अरबाज कॅप्टन होणार असा निर्णय वर्षा यांना सांगितला होता.

हेही वाचा : निक्कीशी असलेली जवळीक अरबाजच्या आईला खटकली; फरीदा म्हणाल्या, “टीव्हीवर दिसतंय ते लोकांना सुद्धा…”

Bigg Boss Marathi – अरबाज पटेल दुसऱ्यांदा झाला कॅप्टन

‘टीम बी’बरोबर कोणतीही रणनीती न आखल्यामुळे वर्षा यांचा अंतिम फेरीत पराभव झाला. शेवटी अरबाज पटेल पुन्हा एकदा या घराचा कॅप्टन झाला. आपला मित्र पुन्हा एकदा कॅप्टन झाल्याने निक्कीला प्रचंड आनंद झाला होता. तर, डीपीची संधी हुकल्यामुळे अंकिताला अश्रू अनावर झाले होते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi arbaz patel second time captain of the house nikki strategy works again sva 00