Bigg Boss Marathi Arbaz Patel : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नुकताच महाराष्ट्राचा धक्का पार पडला. या आठवड्यात रितेश देशमुख कामानिमित्त परदेशात असल्याने त्याच्याऐवजी डॉ. निलेश साबळेने घरात एन्ट्री घेऊन सगळ्या सदस्यांची शाळा घेतली. यावेळी घरात पत्रकार परिषद पार पडली. सर्व सदस्यांना एकेक करून प्रश्न विचारण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अरबाज गेल्या काही दिवसांपासून घरात उत्तम खेळ खेळत आहे. याशिवाय सध्या तो घराचा कॅप्टन देखील झालेला आहे. मात्र, तो प्रत्येक निर्णय निक्की सांगेल त्याचप्रमाणे घेतो. त्याचा स्वत:चा गेम नाही असे अनेक आरोप अरबाजवर करण्यात आले आहेत. यावर अरबाजने, “मला देखील ट्रॉफी जिंकायची आहे आणि मी मला आणि निक्कीला टॉप २ मध्ये पाहतो असं उत्तर दिलं.” काही दिवसांपूर्वी ‘दुर्गा’ मालिकेतल्या कलाकारांनी घरात एन्ट्री घेऊन सदस्यांना काही प्रश्न विचारले होते. यावेळी अरबाजने तो कमिटेड असल्याचं मान्य केलं होतं. त्यामुळे हाच प्रश्न त्याला पुन्हा एकदा विचारण्यात आला.
हेही वाचा : १४ दिवसांत घराबाहेर आलेल्या संग्राम चौगुलेची पहिली पोस्ट! Bigg Boss Marathi च्या प्रवासाबद्दल म्हणाला…
Bigg Boss Marathi – काय म्हणाला अरबाज?
कमिटेड असताना तुला इथे खेळताना बाहेरची भीती वाटत नाही का? यावर अरबाजने थेट उत्तर ‘नाही’ असं दिलं. एवढंच नव्हे तर पुढे, त्याला “बाहेर गेल्यावर तुझं निक्कीशी असलेलं नातं असंच राहणार का?” असाही प्रश्न विचारण्यात आला. यावर अरबाजने ‘हो’ सांगितलं.
अरबाज म्हणाला, “निक्की आणि माझा बॉण्ड तसाच राहणार…मी बाहेरच्या गोष्टी इथे बोलत नाही. माझी आणि निक्कीची काही कमिटमेंट झालेली नाहीये. जे आम्हाला चांगलं वाटतं आम्ही करतो. आमचा एक कम्फर्ट झोन आहे. आता आधी मला घरचं ( बिग बॉस ) बघायचंय. बाहेर गेल्यावर बाहेरच्या गोष्टी बघेन.
पुढे “हे नातं शोसाठी आहे का?” असा प्रश्न विचारताच अरबाज म्हणाला, “नाही…का शोसाठी असेल? आम्ही बाहेर जाऊन पण भेटणार…आमचे खूप प्लॅन्स आहेत. ते प्लॅन्स आम्ही पूर्ण करणार आहोतच.”
हेही वाचा : Bigg Boss Marathi : घराबाहेर झालेली आर्या थेट पोहोचली योगिता चव्हाणच्या घरी; दरवाजात लाडक्या मैत्रिणीला पाहताच…, पाहा व्हिडीओ
निक्की यावर म्हणाली, “आमचे खूप प्लॅन्स आहेत…पण, सगळ्या गोष्टी टेलिकास्ट करू शकत नाही. गेमसाठी मी कधीच कोणाच्या भावनांचा वापर करणार नाही. एवढी घाणेरडी रणनिती माझी नाहीये.”