Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस’च्या घरात चौथ्या आठवड्यात ‘सत्याचा पंचनामा’ हा टास्क झाला. या टास्कदरम्यान जान्हवीने पंढरीनाथ कांबळेच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केलं. त्याच्या अभिनयावर बोट ठेवत “आयुष्यभर ओव्हर अ‍ॅक्टिंग करून दमले म्हणून ती अ‍ॅक्टिंग आता ते घरात दाखवत आहेत.” असं वक्तव्य जान्हवीने पंढरीनाथसाठी केलं. यानंतर सोशल मीडियावर तिच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या.

विशाखा सुभेदार, सुरेखा कुडची, अभिजीत केळकर, सिद्धार्थ जाधव, मेघा धाडे यांसारख्या असंख्य कलाकारांनी जान्हवी विरोधात पोस्ट शेअर करत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. याशिवाय घरात सुद्धा पॅडीबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल आर्याने जान्हवीला थेट जाब विचारला होता. मात्र, तिच्याशी देखील जान्हवीने वाद घातला.

हेही वाचा : Bigg Boss Marathi – बाबाच्या अपमानानंतर पंढरीनाथ कांबळेच्या लेकीची जान्हवीसाठी पोस्ट; म्हणाली, “त्यांच्या करिअरवर बोलण्याआधी…”

नेमकं काय घडलं?

जान्हवी आर्याला म्हणते, “हे लोक सगळे घाणेरडे आहेत. यांच्यात तोंडासमोर येऊन बोलण्याचा दम नाहीये. यांना फक्त अ‍ॅक्टिंग करता येते बाकी काहीच जमत नाही. पॅडी दादा तर काहीतरी अंगात घुसलंय असं वागतात. आयुष्यभर ओव्हर अ‍ॅक्टिंग करून दमले म्हणून ती अ‍ॅक्टिंग आता ते घरात दाखवत आहेत.”

आर्या यानंतर जान्हवीला तिने केलेल्या वक्तव्याबद्दल जाब विचारायला जाते. यावर जान्हवी तिला “मी येणाऱ्या फालतू माणसांना रिप्लाय देत नाही” असं सांगते. यानंतर आर्या तिला “तू जेवढं काम केलं नाहीये…तेवढी त्यांनी अ‍ॅक्टिंग केलीये. तेवढं काम केलंय, थिएटर केलंय. त्यांचं तुझ्यासारखं नाहीये…त्यांनी खूप काम केलंय त्यामुळे उगाच कोणाच्या करिअरवर जाऊ नकोस. इथे तू आधीच घाण करतेय पण, कोणाच्या करिअरवर केलेली घाण ऐकून घेणार नाही. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का?” यावर जान्हवी म्हणते, “फूट जा… मला काहीच नाही समजलं. तुला विचारत असतील तर जा तुझी गँग घेऊन ये…”

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi

हेही वाचा : Bigg Boss Marathi : सुरज चव्हाणला घरी ‘या’ टोपणनावाने मारतात हाक; गुलीगतच्या आत्याने सांगितली खऱ्या नावामागची रंजक गोष्ट

आर्या आपल्यासाठी भांडतेय हे समजल्यावर पंढरीनाथ लगेच बाहेर येतो आणि आर्याला आत घेऊन जातो. या सगळ्या प्रकारानंतर सोशल मीडियावर जान्हवी विरोधात संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळत आहे. या घडल्या प्रकारानंतर जान्हवीने दुसऱ्या दिवशी पॅडी यांची घरात माफी मागितली आहे.