Bigg Boss Marathi Bhaucha Dhakka Updates : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन गेल्या दोन महिन्यांपासून चांगलाच चर्चेत आहे. या कार्यक्रमाला पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनला सध्या टीआरपी देखील मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, एवढी लोकप्रियता मिळूनही हा शो अवघ्या ७० दिवसांमध्ये प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. सध्या शो अंतिम टप्प्यात पोहोचला असून नुकताच घरात ‘फॅमिली वीक स्पेशल’ टास्क पार पडला.

‘फॅमिली वीक’ ( Bigg Boss Marathi ) झाल्यावर शनिवार-रविवारी भाऊच्या धक्क्यावर रितेश सदस्यांना काय बोलणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. मात्र, प्रेक्षकांची सलग दुसऱ्या आठवड्यात निराशा झाली आहे. गेल्या आठवड्यात रितेश, भाऊच्या धक्क्याला उपस्थित राहिला नव्हता. त्याच्याऐवजी घरात महाराष्ट्राचा धक्का घेण्यासाठी डॉ. निलेश साबळेने एन्ट्री घेतली होती. यावेळी घरात पत्रकार परिषद पार पडली तसेच दुसऱ्या दिवशी अशोक सराफ, सुप्रिया पिळगांवकर, स्वप्नील जोशी या कलाकारांनी ‘बिग बॉस’च्या घरात हजेरी लावली होती.

हेही वाचा : २ कोटींचे कर्ज, मुलाच्या शाळेबाहेर भाजीपाला विकला; प्रसिद्ध अभिनेता ‘तो’ प्रसंग सांगताना झाला भावुक, म्हणाला, “लोक मला वेडा…”

रितेश भाऊचा धक्का केव्हा घेणार?

गेल्या आठवड्यात रितेशने भाऊचा धक्का घेतला नव्हता. त्यामुळे या आठवड्यात अभिनेता येऊन काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. मात्र, आजचा एपिसोड ( २८ सप्टेंबर ) सुरू झाल्यावर ‘बिग बॉस’कडून रितेश या आठवड्यात सुद्धा भाऊचा धक्का घेणार नाहीत अशी घोषणा करण्यात आली. अभिनेता शूटिंगसाठी परदेशात असल्याने तो भाऊच्या धक्क्यावर गैरहजर राहणार आहे. आता रितेश थेट ६ ऑक्टोबरला पार पडणाऱ्या महाअंतिम सोहळ्याला शोमध्ये उपस्थित राहील. त्यामुळे आता आठवड्याभराने प्रेक्षकांना ६ ऑक्टोबरला शेवटचा भाऊचा धक्का पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi – Video : राखी सावंत, अभिजीत बिचुकलेनंतर ‘बिग बॉस’मध्ये अनिल थत्तेंची एन्ट्री! निक्कीचं कौतुक, तर वर्षा उसगांवकरांना म्हणाले…

Bigg Boss Marathi : रितेश देशमुख भाऊच्या धक्क्यावर राहणार गैरहजर

दरम्यान, भाऊच्या धक्क्याऐवजी या आठवड्यात घरात अभिजीत बिचुकले, अनिल थत्ते, शरद उपाध्ये, राखी सावंत यांनी एन्ट्री घेतली आहे. आता या आठवड्यात घरातून ८ सदस्यांपैकी कोण निरोप घेणार हे प्रेक्षकांना उद्याच्या भागात पाहायला मिळणार आहे.