Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व यंदा २८ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. यावर्षी वाइल्ड कार्ड एन्ट्री धरून एकूण १७ सदस्य घरात सहभागी झाले होते. यापैकी आता केवळ ८ सदस्य घरात बाकी राहिले असून, यांच्यामध्ये ट्रॉफी जिंकण्यासाठी रंगतदार लढत होणार आहे. आजपासून ‘बिग बॉस’च्या घरात नवव्या आठवड्याच्या खेळाची सुरुवात होणार आहे. पहिल्याच दिवशी ‘बिग बॉस’कडून महत्त्वाची घोषणा करण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘कलर्स मराठी’च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर यासंदर्भातील प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये ‘बिग बॉस’ सांगतात, “यंदाचा सीझन खऱ्या अर्थाने ब्लॉकबस्टर ठरला आहे” यानंतर घरातील सगळे सदस्य भाऊचा धक्का या गाण्यावर नाचू लागतात. सगळ्यांनी एकत्र येऊन नाचून आनंद साजरा केल्यावर ‘बिग बॉस’ पुढे म्हणतात, “आता मला एक महत्त्वाची घोषणा करायची आहे…”

हेही वाचा : “बिग बॉसने निक्कीला गुलीगत धोका…”, अरबाज Eliminate झाल्यावर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस; वाचा भन्नाट प्रतिक्रिया

‘बिग बॉस’ नेमकी काय घोषणा करतात हे या प्रोमोमध्ये सस्पेन्स ठेवण्यात आलं आहे. मात्र, ही घोषणा ऐकल्यावर घरातील सगळे सदस्य शॉक होतात. सगळ्यांनाच धक्का बसल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’च्या प्रोमोवर नेटकऱ्यांकडून प्रतिक्रियांचा पाऊस पाडण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून ‘बिग बॉस’चं पर्व यंदा ७० दिवसांमध्ये संपणार असल्याच्या चर्चा चालू आहेत. यासंदर्भात सोनाली पाटील, तृप्ती देसाई, प्रणित हाटे या कलाकारांनी देखील पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे ‘बिग बॉस’कडून याच संदर्भात महत्त्वाची घोषणा करण्यात येणार असल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा : अरबाज झाला Eliminate! निक्की ढसाढसा रडली…; Bigg Boss Marathi च्या इतिहासात पहिल्यांदाच घडली ‘ही’ गोष्ट

Bigg Boss Marathi : नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

‘बिग बॉस’मराठीच्या नव्या प्रोमोवर यासंदर्भातील असंख्य कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. “‘बिग बॉस’ची महत्त्वाची घोषणा म्हणजे सीझन ६ ऑक्टोबरला संपणार आहे”, “७० दिवसांमध्ये सीझन संपणार”, “यंदा ३० दिवस कमी होणार”, “सीझन लवकर संपणार हीच घोषणा असणार” असा अंदाज नेटकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Bigg Boss Marathi

दरम्यान, आता प्रत्यक्ष ‘बिग बॉस’कडून काय घोषणा करण्यात येणार हे आजच्या भागात स्पष्ट होणार आहे. कलर्स मराठीवर हा भाग रात्री ९ वाजता प्रसारित केला जाणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi big announcement in the house netizens predict show will end on 6 october sva 00