Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन सध्या दणक्यात सुरू आहे. सहाव्या आठवड्यात छोटा पुढारी म्हणजेच घन:श्याम दरवडेने घरातून एक्झिट घेतली. या शोमध्ये घन:श्यामवर अनेक टॅग लावण्यात आले. घरातील अन्य सदस्य कधी त्याला डबल ढोलकी म्हणाले, तर कधी मतावर ठाम नसण्याचा टॅग त्याच्यावर लावण्यात आला. आता ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून बाहेर आल्यावर छोटा पुढारी एकंदर त्याच्या प्रवासाबद्दल नेमकं काय म्हणतोय…जाणून घेऊयात.
घन:श्यामने नुकतीच ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. यावेळी त्याने घरातील अनेक गोष्टींबद्दल खुलासा केला आहे. छोटा पुढारी म्हणाला, “मी सहा आठवडे घरात होतो आणि माझा प्रवास खूप चांगला होता. खरंतर, मी खऱ्या आयुष्यात जसा आहे अगदी तसाच घरात राहिलो…एकदम रिअल राहण्याचा मी प्रयत्न केला. या शोमध्ये खोटं वागून मला बाहेर यायचं नव्हतं.”
हेही वाचा : Bigg Boss Marathi : शिवरायांचा जयघोष करत संग्राम चौगुलेची घरात एन्ट्री! आर्या लाजली, तर अरबाज-निक्की…; पाहा प्रोमो
डबल ढोलकी टॅगविषयी काय म्हणाला घन:श्याम?
घन:श्याम पुढे म्हणाला, “सगळे लोक डोक्याने गेम खेळतात. पण, मी डोकं लावून गेम खेळलो नाही. मी माझ्या मनाने गेम खेळलो. आज घराबाहेर आलोय तरी, मला जास्त दु:ख नाही. कदाचित मराठी माणसांच्या मनात स्थान निर्माण करण्यात मी कमी पडलो असेन याचं निश्चितच दु:ख आहे.”
दुसऱ्याच आठवड्यात घन:श्यामला डबल ढोलकी म्हटलं गेलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना तो म्हणाला, “घरातल्या लोकांनी मला हे टॅग दिले आणि शेवटी टॅग देणं गरजेचं असतं. मी एक स्पर्धक आहे आणि ते पण तिथे खेळण्यासाठी आले होते. त्यांना माझ्याबद्दल भीती असेल. कारण, माझ्याशिवाय त्यांची कोणतीच चर्चा पूर्ण व्हायची नाही. मग, तुम्ही कुठेही जा…कोणत्याही ग्रुपकडे बघा. सकारात्मक चर्चा असो वा नकारात्मक घन:श्याम सोडून या लोकांनी चर्चा केलीच नाही. त्यांना मी वीक नव्हे तर स्टाँग वाटत होतो. सगळ्यांनीच मला बाहेर काढायचं ठरवलं होतं. माझी बाथरुममध्ये पण चर्चा व्हायची. सगळीकडे चर्चा… त्यामुळेच त्यांनी मला बाहेर काढलं.”
दरम्यान, घन:श्यामचा प्रवास संपला असला तरीही आता घरात ( Bigg Boss Marathi ) एका नव्या वाइल्ड कार्ड सदस्याने एन्ट्री घेतली आहे. या सदस्याचं नाव संग्राम चौगुले आहे. आता त्याच्या येण्याने घरातलं समीकरण कसं बदलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.