Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून छोटा पुढारी घन:श्यामने नुकतीच एक्झिट घेतली. गेल्या आठवड्यात अभिजीत, आर्या, धनंजय, निक्की, सूरज, अरबाज आणि घन:श्याम असे एकूण सात सदस्य नॉमिनेट होते. यापैकी सर्वात कमी मत मिळाल्याने घन:श्याम घराबाहेर पडला. शोमधून बाहेर आल्यावर त्याने ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली आहे. यावेळी त्याने जान्हवीबरोबर झालेल्या भांडणांबाबत भाष्य केलं आहे. घन:श्याम जान्हवीबद्दल काय म्हणाला जाणून घेऊयात…

घन:श्याम म्हणाला, “जान्हवीला मी वेळोवेळी प्रत्येक गोष्ट सांगत होतो. एखाद्या व्यक्तीला त्याच्या व्यक्तिरेखेवर, त्याच्या आयुष्यावर, करिअरवर आणि कुटुंबावर बोलणं चुकीचं आहे. या चार गोष्टी टाळून तुम्ही कशावरही बोला. तुम्हाला बोलायचंय ना तर वर्षा ताईंना खेळाविषयी बोला. वर्षा ताई, पॅडी दादा, अभिजीत दादा तुमच्यासाठी स्पर्धक आहेत. पण, तुम्ही त्यांच्या करिअरवर बोलू नका.”

हेही वाचा : Bigg Boss Marathi “डोकं लावून गेम खेळलो नाही…”, ‘डबल ढोलकी’ आरोपाविषयी घन:श्याम स्पष्टच बोलला; घराबाहेर आल्यावर पहिली प्रतिक्रिया

जान्हवीबद्दल काय म्हणाला घन:श्याम?

घन:श्याम पुढे म्हणाला, “मी जान्हवीला या सगळ्या गोष्टी वारंवार समजावून सांगितल्या. आमचं भांडण असेल पण, ते फक्त वैचारिक मतभेद आहेत, आमच्यात दुसरे काहीच वाद नव्हते. मी जान्हवीला नेहमी सांगायचो… तू भांडण कर पण, एखाद्याच्या इज्जतीचा कचरा होईल असं बोलत जाऊ नकोस.”

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi : ( फोटो सौजन्य : कलर्स मराठी )

“बिग बॉस’च्या ( Bigg Boss Marathi ) घरातील कोणत्याही सदस्याने सांगावं मला की, घन:श्याम दरवडे आमच्याबद्दल अपशब्द बोलला आहे. पण, माझ्याबद्दल कोणी वाईट बोललं तर मी समोरच्याला सुट्टी देत नाही. माझ्या अंगावर एखादी गोष्ट आली तर, मी त्याला शिंगावर घेतल्याशिवाय राहत नाही. जान्हवी मला मतिमंद, बालिश म्हणाली. एवढंच नाहीतर पाण्यात जाऊन जीव दे, तुझी लायकी नाही, तू इथे काय करणार आहेस…तुला चुकून बिग बॉसने इथे घेतलं असं सगळं ती बोलत होती. त्यामुळे माझाही संयम सुटला आणि त्यानंतर मग ती म्हणालो. तू आता वर्षा ताईंचा अपमान केला, पॅडी दादांचा अपमान केला…हेच करायचंय तुला कारण, बाहेर जाऊन तरी काय काम आहे? असं मी तिला सहज बोलून गेलो. त्यामुळे कलाकार कोणताही असला तरी आपण प्रत्येकाचा आदर केला पाहिजे” असं मत यावेळी घन:श्यामने मांडलं आहे.

Story img Loader