Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. येत्या दोन आठवड्यांमध्ये या सीझनचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. सध्या घरात ८ सदस्य बाकी राहिले आहेत. ‘बिग बॉसने’ या आठवड्यात सगळ्या सदस्यांना थेट नॉमिनेट केलं आहे. याशिवाय सोमवारी घरात आणखी एक टास्क पार पडला. यामध्ये घरात ठामपणे मत मांडता न येणाऱ्या सदस्यांना टार्गेट करायचं होतं.

‘बिग बॉस’ने टार्गेट करण्याच्या टास्कमध्ये दोन टीम केल्या होत्या. यावेळी अंकिताने विरुद्ध टीममध्ये असलेल्या सूरजला टार्गेट केलं. यामुळे नेटकऱ्यांसह सूरजच्या चाहत्यांनी तिच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. तसेच या पर्वात सहभागी झालेल्या घन:श्याम दरवडेने सुद्धा याबद्दल व्हिडीओ शेअर करत आपलं मत मांडलं आहे. त्याने या व्हिडीओला “अंकिता ताई तू फार चुकीचं केलंस…” असं कॅप्शन दिलं आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : Video : लगोरीचा खेळ जान्हवीला पडणार भारी! टास्कदरम्यान झाली दुखापत, नेमकं काय घडलं? पाहा व्हिडीओ

अंकिताबद्दल काय म्हणाला घन:श्याम ?

छोटा पुढारी घन:श्याम या व्हिडीओमध्ये म्हणतो, “बिग बॉस’च्या घरात सदस्यांना टार्गेट करण्याचा टास्क होता. यावेळी अंकिताने सूरजला ठाम मतं मांडता येत नाही, गेम समजत नाही हे निकष देऊन टार्गेट केलं. अगं, अंकिता ताई सर्वांना माहितीये सूरजला गेम किती कळतो, त्याला खेळता येतं की नाही आणि त्याला किती मतं मांडता येतात… या गोष्टी आता सर्वांना माहिती आहेत. पण, तू त्याला सख्ख्या भावासारखं मानलं आहेस. एकीकडे तू म्हणतेस मी सूरजला घर बांधून देणार आणि दुसरीकडे ‘बिग बॉस’चं घर त्याच्याकडून हिरावून घेतेस. हे कितपत योग्य आहे? अंकिता ताई, तू गेम खेळ पण, सहानुभूतीचा खेळ नको खेळूस…ही माझी विनंती आहे.”

हेही वाचा : Bigg Boss Marathi : Video: “मी या लोकांसमोर झुकणार नाही”, अरबाज घराबाहेर पडल्यानंतर निक्की तांबोळीचा निर्धार, म्हणाली, “माझं साम्राज्य…”

Bigg Boss Marathi : अंकिता वालावलकर

दरम्यान, अंकिताच्या चाहत्यांनी या आरोपांवर कमेंट्समध्ये स्पष्टीकरण देत, संबंधित टास्कमध्ये विरुद्ध टीमच्या सदस्यांना केवळ टार्गेट करायचं होतं, नॉमिनेट करायचं नव्हतं त्यामुळे अंकिताने खरेपणाने मत मांडलं असं म्हटलं आहे. आता घरातील या ८ सदस्यांमध्ये भाऊच्या धक्क्यावर कोणाचा प्रवास संपणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.