Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आता ८ व्या आठवड्याच्या खेळाला सुरुवात झाली आहे. या आठवड्याची थीम ‘जंगलराज’ अशी आहे. सोमवारच्या भागात या थीमनुसार घरातील सदस्यांना ‘शिकाऱ्याची बंदूक’ हा नॉमिनेशन टास्क देण्यात आला होता. या कार्यात निक्की, अरबाज, जान्हवी, सूरज आणि वर्षा हे पाच सदस्य घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले आहेत. यानंतर आजच्या भागात ‘बिग बॉस’ने सदस्यांसमोर एक मोठा पेच निर्माण केल्याचं पाहायला मिळालं.

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमध्ये स्पर्धकांना दर आठवड्यात बीबी करन्सी मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. या करन्सीमधून सगळे स्पर्धक अन्नधान्य, लक्झरी प्रॉडक्ट विकत घेतात. पण, या आठवड्यात ‘बिग बॉस’ने एक नवी ट्विस्ट आणला आहे. हा ट्विस्ट म्हणजे, ‘बिग बॉस’ निक्कीला चहा बनवा असा आदेश देतात. मात्र, खूप प्रयत्न करून देखील गॅसची फ्लेम पेटत नसते. त्यामुळे नक्कीच काहीतरी गडबड आहे हे सगळे सदस्य ओळखतात. यानंतर ‘बिग बॉस’ घरातील गॅस कनेक्शन बंद केल्याचं सांगतात.

shradhha kapoor shakti kapoor
शक्ती कपूर यांनी ‘ही’ सवय सोडण्यासाठी बिग बॉसमध्ये घेतला होता सहभाग; आठवण सांगत म्हणाले, “मी श्रद्धाला सिद्ध करून…”
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Bigg Boss 18 Edin Rose Yamini Malhotra is evicted from salman khan show after digvijay rathee evicted
Bigg Boss 18: दिग्विजय सिंह राठीनंतर आणखी दोन सदस्य घराबाहेर; कशिश कपूर ढसाढसा रडत म्हणाली, “इथे प्रत्येकजण साप…”
Bigg Boss 18 Digvijay Singh Rathee says who will win the show
Bigg Boss 18: दिग्विजय सिंह राठीच्या मते करणवीर मेहरा नाही, तर ‘हा’ सदस्य होणार विजयी; म्हणाला…
appear in Celebrity MasterChef show coming soon
‘बिग बॉस मराठी ५’ फेम निक्की तांबोळी ‘या’ लोकप्रिय कार्यक्रमात झळकणार, सोबतीला असणार उषा नाडकर्णींसह प्रसिद्ध कलाकार
Salman Khan And Digvijay Rathee
Video : ‘बिग बॉस १८’मधून बाहेर पडताच दिग्विजय सिंह राठी झाला भावुक; खंत व्यक्त करीत म्हणाला, “लोक खूप लवकर…”
Massive fire breaks out at plywood factory in Naigaon factory materials burn
नायगाव मध्ये प्लायवूड कारखान्याला भीषण आग, कारखान्यातील साहित्य जळून खाक
Bigg Boss 18 Digvijay Rathee is EVICTED from salman khan show
Bigg Boss 18: फिनालेच्या चार आठवड्यांआधी अचानक ‘हा’ सदस्य घराबाहेर; शिल्पा शिरोडकर, ईशा सिंहला अश्रू झाले अनावर
Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi : घरातील गॅस कनेक्शन केलं बंद

हेही वाचा : Bigg Boss Marathi – Video : लेकीला पाहून आर्याच्या आईला अश्रू अनावर…; ‘बिग बॉस’ने घराबाहेर काढलं, पण अमरावतीत जल्लोषात स्वागत

‘बिग बॉस’ने आता गॅस कनेक्शन बंद केल्यामुळे खायचं काय असा प्रश्न सर्वांसमोर निर्माण होतो. अंकिता याबद्दल प्रश्न देखील विचारते. शेवटी, ‘बिग बॉस’ ( Bigg Boss Marathi ) नव्या टास्कची घोषणा करत “आता जेवढी बीबी करन्सी तुम्ही कमवाल… तेवढा वेळ कालमर्यादेनुसार तुम्हाला गॅस वापरता येईल” असं सर्वांना सांगतात.

‘बिग बॉस’चा निर्णय ऐकून सर्वांनाच धक्का बसतो. यानंतर घरात एक नवीन टास्क सुरू होतो. या टास्कमध्ये ‘बिग बॉस’ ज्याप्रमाणे जोड्या सांगतील त्यानुसार एका सदस्याने अभिनय करायचा आहे, तर दुसऱ्या सदस्याने कोणता प्राणी आहे हे समोरच्या सदस्याच्या अभिनयावरून ओळखून त्यानंतर पळत जाऊन हे प्राणी अ‍ॅक्टिव्हिटी रुममधून शोधून आणायचे आहेत.

‘बिग बॉस’ पहिल्या फेरीत पॅडी आणि संग्राम यांच्या जोडीची निवड करतात. हे दोघंही २० हजार रुपये बीबी करन्सी कमावतात. तर, दुसऱ्या फेरीत वर्षा आणि धनंजयची जोडी ३० हजार बीबी करन्सी कमावते.

हेही वाचा : “लोकांना वाटतं शासकीय कोट्यातून…”, नव्या घराबद्दल स्पष्टच बोलला प्रसाद ओक; ट्रोलर्सला सुनावत म्हणाला, “२८ वर्षे राबून घर घेतलं”

Bigg Boss Marathi : जान्हवी-अरबाजची ‘अशी’ झाली फजिती

‘बिग बॉस’ तिसऱ्या फेरीसाठी जान्हवी आणि अरबाज यांच्या नावाची घोषणा करतात. मात्र, यातला काकाकुवा हा पक्षी कोणालाच माहिती नसतो. त्यामुळे दोघांचीही मोठी फजिती होती. अरबाज शेवटी पक्षी शोधून आणतो पण, या दोघांना सीक्वेन्स नीट लावता येत नाही परिणामी, टाकीतलं पाणी संपून तिसरी फेरी रद्द होते. यामुळे जान्हवी-अरबाजला शून्य रुपये म्हणजेच या टास्कमध्ये काहीच करन्सी जिंकता येत नाही. जेवढी कमी बीबी करन्सी तेवढा कमी वेळ सगळ्या सदस्यांना गॅस वापरता येणार आहे.

आजच्या भागात केवळ तीन फेऱ्या पार पडल्या आहेत. आता या टास्कमध्ये सूरज, अंकिता, अभिजीत आणि निक्की यांनी सहभागी होणं अजून बाकी आहे. त्यामुळे ‘बिग बॉस’च्या ( Bigg Boss Marathi ) येत्या भागात उर्वरित जोड्या किती रुपये करन्सी कमावणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

Story img Loader