Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आता ८ व्या आठवड्याच्या खेळाला सुरुवात झाली आहे. या आठवड्याची थीम ‘जंगलराज’ अशी आहे. सोमवारच्या भागात या थीमनुसार घरातील सदस्यांना ‘शिकाऱ्याची बंदूक’ हा नॉमिनेशन टास्क देण्यात आला होता. या कार्यात निक्की, अरबाज, जान्हवी, सूरज आणि वर्षा हे पाच सदस्य घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले आहेत. यानंतर आजच्या भागात ‘बिग बॉस’ने सदस्यांसमोर एक मोठा पेच निर्माण केल्याचं पाहायला मिळालं.
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमध्ये स्पर्धकांना दर आठवड्यात बीबी करन्सी मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. या करन्सीमधून सगळे स्पर्धक अन्नधान्य, लक्झरी प्रॉडक्ट विकत घेतात. पण, या आठवड्यात ‘बिग बॉस’ने एक नवी ट्विस्ट आणला आहे. हा ट्विस्ट म्हणजे, ‘बिग बॉस’ निक्कीला चहा बनवा असा आदेश देतात. मात्र, खूप प्रयत्न करून देखील गॅसची फ्लेम पेटत नसते. त्यामुळे नक्कीच काहीतरी गडबड आहे हे सगळे सदस्य ओळखतात. यानंतर ‘बिग बॉस’ घरातील गॅस कनेक्शन बंद केल्याचं सांगतात.
हेही वाचा : Bigg Boss Marathi – Video : लेकीला पाहून आर्याच्या आईला अश्रू अनावर…; ‘बिग बॉस’ने घराबाहेर काढलं, पण अमरावतीत जल्लोषात स्वागत
‘बिग बॉस’ने आता गॅस कनेक्शन बंद केल्यामुळे खायचं काय असा प्रश्न सर्वांसमोर निर्माण होतो. अंकिता याबद्दल प्रश्न देखील विचारते. शेवटी, ‘बिग बॉस’ ( Bigg Boss Marathi ) नव्या टास्कची घोषणा करत “आता जेवढी बीबी करन्सी तुम्ही कमवाल… तेवढा वेळ कालमर्यादेनुसार तुम्हाला गॅस वापरता येईल” असं सर्वांना सांगतात.
‘बिग बॉस’चा निर्णय ऐकून सर्वांनाच धक्का बसतो. यानंतर घरात एक नवीन टास्क सुरू होतो. या टास्कमध्ये ‘बिग बॉस’ ज्याप्रमाणे जोड्या सांगतील त्यानुसार एका सदस्याने अभिनय करायचा आहे, तर दुसऱ्या सदस्याने कोणता प्राणी आहे हे समोरच्या सदस्याच्या अभिनयावरून ओळखून त्यानंतर पळत जाऊन हे प्राणी अॅक्टिव्हिटी रुममधून शोधून आणायचे आहेत.
‘बिग बॉस’ पहिल्या फेरीत पॅडी आणि संग्राम यांच्या जोडीची निवड करतात. हे दोघंही २० हजार रुपये बीबी करन्सी कमावतात. तर, दुसऱ्या फेरीत वर्षा आणि धनंजयची जोडी ३० हजार बीबी करन्सी कमावते.
Bigg Boss Marathi : जान्हवी-अरबाजची ‘अशी’ झाली फजिती
‘बिग बॉस’ तिसऱ्या फेरीसाठी जान्हवी आणि अरबाज यांच्या नावाची घोषणा करतात. मात्र, यातला काकाकुवा हा पक्षी कोणालाच माहिती नसतो. त्यामुळे दोघांचीही मोठी फजिती होती. अरबाज शेवटी पक्षी शोधून आणतो पण, या दोघांना सीक्वेन्स नीट लावता येत नाही परिणामी, टाकीतलं पाणी संपून तिसरी फेरी रद्द होते. यामुळे जान्हवी-अरबाजला शून्य रुपये म्हणजेच या टास्कमध्ये काहीच करन्सी जिंकता येत नाही. जेवढी कमी बीबी करन्सी तेवढा कमी वेळ सगळ्या सदस्यांना गॅस वापरता येणार आहे.
आजच्या भागात केवळ तीन फेऱ्या पार पडल्या आहेत. आता या टास्कमध्ये सूरज, अंकिता, अभिजीत आणि निक्की यांनी सहभागी होणं अजून बाकी आहे. त्यामुळे ‘बिग बॉस’च्या ( Bigg Boss Marathi ) येत्या भागात उर्वरित जोड्या किती रुपये करन्सी कमावणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.