Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’चा ग्रँड फिनाले ६ ऑक्टोबरला पार पडणार आहे. यंदाचं पर्व तुफान गाजलं. सीझनमधले सगळे टास्क, भांडणं, अपमान, स्पर्धकांची मैत्री, निक्की-अरबाज कनेक्शन या सगळ्या गोष्टींची बाहेर भरभरून चर्चा झाली. गेल्या काही महिन्यांपासून ‘बिग बॉस मराठी’ टीआरपीच्या शर्यतीत सुद्धा आघाडीवर आहे. मात्र, प्रेक्षकांचा एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळूनही अवघ्या ७० दिवसांमध्ये हे पर्व प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
२८ जुलैला एकूण १६ स्पर्धकांनी ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री घेतली होती. यापैकी आता घरात केवळ ६ सदस्य बाकी राहिले आहेत. धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, अंकिता वालावलकर आणि सूरज चव्हाण या सहा स्पर्धकांमध्ये ग्रँड फिनालेला चुरशीची लढत होणार आहे. आता यांच्यामध्ये कोण बाजी मारणार हे ६ ऑक्टोबरला म्हणजेच उद्या स्पष्ट होईल. मात्र, सोशल मीडियावरचे वोटिंग ट्रेंड सध्या काय सांगतात याबाबत जाणून घेऊयात…
हेही वाचा : देशमुखांच्या घरी नवरात्रीचा उत्साह! जिनिलीयाने सासूबाईंसह केली पूजा, शेअर केला Inside व्हिडीओ
Bigg Boss Marathi : कोणता सदस्य आघाडीवर?
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या काही दिवसांपासून घरातून बेघर कोण होणार, वाइल्ड कार्ड म्हणून घरात कोण येणार? एवढंच नव्हे तर यंदाचं पर्व ७० दिवसांमध्ये संपणार या सर्व गोष्टींची माहिती आधीच ‘बिग बॉस’च्या फॅन पेजेसद्वारे दिली जाते आणि यंदा नेटकऱ्यांचा प्रत्येक अंदाज खरा ठरला आहे. याचप्रमाणे सध्या वोटिंगमध्ये आघाडीवर कोण आहे याची चर्चा सुद्धा सोशल मीडियावर रंगली आहे.
वोटिंगनुसार सर्वत्र सूरज चव्हाण बाजी मारत असल्याचं स्पष्ट होत आहे. या खालोखाल अंकिता, अभिजीत, धनंजय यांचा क्रमांक लागतो. या तिघांना मिळणारी मतं लक्षात घेता यांचं स्थान सध्या तरी स्थिर नाही. प्रेक्षकांच्या मतांनुसार दुसऱ्या-तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर कोण असेल याची स्पष्टता लवकरच येईल. मात्र, पाचव्या स्थानावर निक्की आहे, तर वोटिंग ट्रेंडनुसार सर्वात खाली म्हणजेच सहाव्या स्थानावर जान्हवी आहे.
हेही वाचा : Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात पुन्हा एंट्री, पण ‘तो’ एक सदस्य गैरहजर; नेटकरी म्हणाले…
आता सोशल मीडियावर ट्रेंड होणारे हे वोटिंग पोल्स खरे ठरून सूरज यंदाचा विजेता होणार की, ग्रँड फिनालेमध्ये वेगळं चित्र पाहायला मिळणार हे लवकरच स्पष्ट होईल.