Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व जरी संपलं असलं तरीही, या कार्यक्रमातील प्रत्येक सदस्य आजही एकमेकांच्या संपर्कात आहेत. इरिना, वैभव आणि धनंजय हे तिघंही नुकतेच एकत्र भेटले होते. यापूर्वी इरिना-वैभव दोघंही कोल्हापूरला धनंजय पोवारच्या घरी सुद्धा गेले होते. यावेळी पोवार कुटुंबीयांनी या दोघांचं जंगी स्वागत केल्याचं पाहायला मिळालं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस मराठी’च्या बहुतांश सदस्यांनी घरात जोडलेली नाती बाहेर येऊन सुद्धा कायमस्वरुपी जपली आहे. वैभव सुरुवातीला निक्की-अरबाजबरोबर खेळत होता. मात्र, कालांतराने त्याला खेळाची समज आली… बरोबर काय चुकीचं काय यातला फरत समजू लागला. त्यामुळे वैभव घरातून एलिमिनेट होताना काही दिवस आधी त्याची धनंजयशी घट्ट मैत्री झाली. त्याने धनंजयला घरातील आपला जवळचा मित्र आणि भाऊ मानलं. तर, इरिनाने तिच्या लाडक्या डीपी दादांना राखी बांधली होती. आता नुकतंच या तिघांचं रियुनियन झालं होतं.

हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दोन्ही परीक्षक अन् ‘हे’ लोकप्रिय कलाकार झळकणार एकाच चित्रपटात! जाहीर केली प्रदर्शनाची तारीख

वैभव सतत व्यायाम करून स्वत:च्या शरीराची, आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी काळजी घेत असतो. मात्र, धनंजयने नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये वैभवचे सिक्स पॅक्स ॲब्स आता गायब झाल्याचं म्हटलं आहे.

वैभवचा लूक पाहून इरिनाला आश्चर्याचा धक्का बसतो. ती वैभवला म्हणते, “अरे सिक्स पॅक कुठे गेले?” यावर त्याला सुद्धा हसू अनावर होतं. इरिना आणि धनंजय दोघं मिळून वैभवची खिल्ली उडवतात.

धनंजय स्वत:चं सुटलेलं पोट दाखवून वैभवला चिअर्स म्हणतो. तर, इरिना देखील त्याची खिल्ली उडवते. हा व्हिडीओ डीपीने इन्स्टाग्रामवर शेअर करत याला, “मी असं ऐकलं होतं की, जिम वाल्यांच्या नादाला लागल्यावर तब्येत चांगली होते पण, माझ्यामुळे वैभवचे सिक्त पॅक्स ॲब्स हरवले बहुतेक” असं भन्नाट कॅप्शन दिलं आहे. या व्हिडीओमध्ये इरिना आणि धनंजय वैभवची खिल्ली उडवत असल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : मृणाल दुसानिसच्या नव्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचले ‘हे’ मराठी कलाकार! शशांक केतकर मैत्रिणीबद्दल म्हणाला, “जिद्द, मेहनत…”

हेही वाचा : Video: प्रेमिका ने प्यार से…; ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील सूर्यादादाचा काजू, पुड्याबरोबर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

धनंजय, इरिना आणि वैभवच्या ( Bigg Boss Marathi ) या मजेशीर व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स अन् कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “कोल्हापुरकरांचा नाद लई वाईट”, “Dp खूप हसतोय यार”, “खावा अजून मटण”, “चिअर्स…” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi dhananjay powar and irina laugh at vaibhav chavan video viral sva 00