Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आता ‘फॅमिली वीक’ टास्क सुरू झालेला आहे. ‘कलर्स मराठी’ने अभिजीत सावंतच्या कुटुंबीयांचा व्हिडीओ शेअर करत ही आनंदाची बातमी सर्व प्रेक्षकांना दिली. आता ‘फॅमिली वीक स्पेशल’ या टास्कचा दुसरा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या भावुक करणाऱ्या प्रोमोमध्ये धनंजयचे आई-बाबा व त्याची पत्नी यांची झलक पाहायला मिळत आहे.

आपल्या वडिलांच्या तोंडून अभिमानाचे शब्द ऐकावे, ‘धनंजयचे वडील’ असं माझ्या वडिलांना ओळखलं जावं अशी डीपीची खूप आधीपासूनची इच्छा होती. अखेर मुलाने मिळवलेलं हे यश पाहण्यासाठी धनंजयचे वडील स्वत: ‘बिग बॉस’च्या घरात येणार आहेत. याचा खास प्रोमो ‘कलर्स मराठी’ वाहिनीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

What Manoj Jarange Said?
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं वक्तव्य, “धनंजय मुंडे रात्री दोन वाजता भेटले होते, वाल्मिक कराडही होता, सगळे पाया पडले आणि…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
gajlakshmi
२६ जुलैपासून ‘या’ ३ राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा! शुक्र-गुरुच्या युतीमुळे निर्माण होईल ‘गजलक्ष्मी राजयोग’, चांगले दिवस येणार
lakhat ek amcha dada fame isha sanjay and juee tanpure dance on uyi amma
Video : सूर्या दादाच्या बहि‍णींचा जबरदस्त डान्स! सुपरहिट ‘उई अम्मा’ गाण्यावर थिरकल्या, नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस
Myra Vaikul
मायरा वायकूळ रडण्याचा सीन शूट करण्यासाठी काय करायची? म्हणाली, “मी एका जागेवर…”
madhuri dixit reveals both sons having inherited love for cooking
“माझ्या दोन्ही मुलांना…”, माधुरी दीक्षितने पतीला ‘या’ गोष्टीचं दिलं श्रेय, आठवण सांगत म्हणाली, “अमेरिकेत असताना…”
Sanjay Raut Slam BJP
Sanjay Raut : शिवसेनेत ‘उदय’ होणार यावर राऊत ठाम, चंद्राबाबू आणि नितीश कुमारांच्या पक्षाबद्दलही केला मोठा दावा; म्हणाले, “यांच्या तोंडाला रक्त…”
Pimpri , fire, worker house, cash burnt, loksatta news,
पिंपरी : कामगाराच्या घराला भीषण आग, पाच लाखांची रोकड जळून खाक

हेही वाचा : Bigg Boss Marathi अखेर ‘तो’ क्षण आलाच! पत्नी व मुलींना पाहून अभिजीत झाला भावुक, गायकाच्या लेकीची Bigg Boss ला गोड विनंती, म्हणाली…

कुटुंबीयांना पाहून धनंजय झाला भावुक

‘बिग बॉस’ म्हणतात, “या घरातील एका सदस्याचं स्वप्न होतं आपल्या वडिलांनी आपलं कौतुक करावं आणि आज तो दिवस आला आहे…” यानंतर घरात धनंजयच्या वडिलांची एन्ट्री होते. बाबा समोरून येत असल्याचं पाहून धनंजयच्या अश्रूंचा बांध फुटतो. ‘बिग बॉस’ संपूर्ण घर कुटुंबीयांना दाखवताना डीपी आपल्या वडिलांच्या पायाजवळ बसल्याचं पाहायला मिळत आहे. वडील-मुलाचं हे हृदयस्पर्शी नातं बघून नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

धनंजयची आई व पत्नी कल्याणी या दोघींनी देखील ‘बिग बॉस’च्या घरात उपस्थिती लावली होती. दोघींना पाहिल्यावर डीपी खूपच भावुक झाला होता. आई अन् पत्नीला जवळ घेऊन हा कोल्हापूरचा रांगडा गडी प्रचंड रडला. हा भावुक प्रोमो सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

हेही वाचा : Kaun Banega Crorepati 16: २२ वर्षीय स्पर्धकाने ७ कोटींच्या ‘या’ प्रश्नावर सोडला खेळ; तुम्हाला माहीत आहे का उत्तर?

वडिलांना मिठी मारून डीपी रडला

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi : धनंजय पोवार

हेही वाचा : Jigra Trailer : परदेशात अडकलेल्या भावाची सुटका कशी करणार आलिया भट्ट? ‘जिगरा’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित, गोष्ट आहे खूपच रंजक

धनंजय आणि त्याच्या कुटुंबीयांवर हा प्रोमो पाहून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. “वडिलांकडून अभिमानाचे शब्द ऐकताच, DP च्या अश्रूंचा फुटला बांध!” असं कॅप्शने देत वाहिनीने ( Bigg Boss Marathi ) हा प्रोमो शेअर केला आहे. अभिजीत, धनंजय या दोघांव्यतिरिक्त आजच्या भागात घरात आणखी कोणाचं कुटुंब येणार हे पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.

Story img Loader