Bigg Boss Marathi Season 5 BB Party : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व संपण्यासाठी आता अवघे तीन दिवस बाकी राहिले आहेत. शो आता अंतिम टप्प्यात आला असून घरात आज मिडीवीक एलिमिनेशन होणार आहे. सध्या ‘बिग बॉस’च्या घरात अभिजीत सावंत, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, वर्षा उसगांवकर, धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर आणि अंकिता वालावलकर असे सात सदस्य आहेत. यापैकी ‘तिकीट टू फिनाले’ जिंकल्यामुळे निक्की थेट अंतिम फेरीत पोहोचली आहे. ग्रँड फिनालेमध्ये एन्ट्री घेणारी निक्की यंदाची पहिली स्पर्धक ठरली आहे. मात्र, उर्वरित सदस्यांच्या डोक्यावर एलिमिनेशनची टांगती तलवार आहे.

घरातील सहा सदस्य सध्या नॉमिनेट असून यांच्यापैकी शेवटच्या क्षणी कोणता सदस्य घराचा निरोप घेणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, या एलिमिनेशन टास्कपूर्वी घरातील सगळ्या सदस्यांसाठी ‘बिग बॉस’ने एका पार्टीचं आयोजन केलं आहे. यासाठी घरात एन्ट्री घेणार आहे डीजे क्रेटेक्स.

Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
chota pudhari aka ghanshyam darode bought new place from bb money
छोटा पुढारी घन:श्यामने Bigg Boss मधून मिळालेल्या पैशांचं काय केलं? चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, म्हणाला…
punha kartvya aahe
Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”
Navri Mile Hirlarla
Video : “आज मी सगळी गडबड…”, दु:खात असलेल्या लीलाला आली एजेची आठवण; मालिकेत येणार ट्विस्ट, पाहा प्रोमो
ankita walawalkar fiance kunal express gratitude towards dhananjay powar
“दादा लग्नाला या, जोरात कानात पिळा…”, धनंजयच्या व्हिडीओवर अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची कमेंट, आभार मानत म्हणाला…
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “डॅडीसारखा देवमाणूस…”, शत्रूचे स्वप्न पूर्ण होणार अन् तेजूचे आयुष्य पालटणार; सूर्याने केली बहिणीची पाठवणी, पाहा प्रोमो

हेही वाचा : Bigg Boss Marathi : “प्रेक्षकांच्या मतांमुळे सूरज जिंकेल पण, गेमचा विचार केला तर…”, Bigg Boss च्या विजेत्याबद्दल शिव ठाकरेचं मोठं वक्तव्य, म्हणाला…

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi : ( फोटो सौजन्य : लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

‘तांबडी चांबडी’वर सदस्य थिरकणार

मराठमोळा कृणाल घोरपडे सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. त्याचं ‘तांबडी चांबडी’ हे गाणं सर्वत्र तुफान व्हायरल होत आहे. रिमिक्स आणि टेक्नो-म्युझिक गाणी केल्यानंतर एक मूळ ओरिजिनल गाणं संगीतबद्ध करावं अशी क्रेटेक्सची इच्छा होती. अखेर श्रेयस सागवेकरच्या साथीने क्रेटेक्सने ‘तांबडी चांबडी’ गाणं तयार केलं आणि आजच्या घडीला सोशल मीडियापासून ते क्लबपर्यंत सर्वत्र या गाण्याने पसंती मिळवली आहे. याशिवाय आज हे गाणं ‘बिग बॉस’च्या ( Bigg Boss Marathi ) घरात देखील वाजणार आहे.

हेही वाचा : ‘बिग बॉस १८’मध्ये सहभागी होणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला दिवसाला मिळणार ५.४ लाख रुपये? ‘इतक्या’ कोटींची केली आहे मागणी

डीजे क्रेटेक्सच्या तालावर सगळे सदस्य थिरकत असल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. मात्र, यानंतर सदस्यांना एक मोठा धक्का मिळणार आहे. तो म्हणजे, या कार्यक्रमानंतर घरात मिडवीक एव्हिक्शन पार पडणार आहे. आता या सात जणांपैकी कोण घराचा निरोप घेणार आणि यंदाचे टॉप-६ सदस्य कोण ठरणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

Story img Loader