Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व संपलं असलं तरीही या पर्वातील स्पर्धेक चांगलेच चर्चेत आहेत. विजेता सूरज चव्हाणसह इतर स्पर्धकांच्या खेळाचं कौतुक होतं आहे. अशातच अभिजीत बिचुकले यांनी पंढरीनाथ कांबळेवर टीका केली आहे. पंढरीनाथविषयी बोलताना अभिजीत बिचुकले यांची जीभ घसरली. ते नेमकं काय म्हणाले? जाणून घ्या…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाच्या अंतिम आठवड्यात अभिजीत बिचुकले पाहुणे म्हणून घरात गेले होते. यावेळी पंढरीनाथ कांबळेने त्यांच्या डॉक्टरेटच्या पदवीबद्दल विचारले. यावरूनच अभिजीत बिचुकले आता भडकले असून त्यांनी पंढरीनाथवर जहरी टीका केली आहे.

हेही वाचा – Video: “पॅडी दादांनी मला एवढा जीव लावला…”, ट्रॉफी जिंकल्यावर अखेर सूरजने मान्य केली ‘ती’ गोष्ट, पंढरीनाथबद्दल म्हणाला…

‘चालु वार्ता’ या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना अभिजीत बिचुकलेंनी पंढरीनाथवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, “‘बिग बॉस मराठी’ विशेष करून अभिजीत बिचुकलेमुळे गाजलं आहे. त्याच्यानंतर मी हिंदी ‘बिग बॉस’मध्ये गेलो आणि त्यामध्ये मी कोणा-कोणाची उतरवून आलो होतो, हे काही सांगायची गरज नाहीये. यानंतर मी ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात पाहुणा म्हणून गेलो. तेव्हा ‘बिग बॉस’ म्हणतायत डॉक्टर अभिजीत बिचुकले आपलं स्वागत आहे. त्याच्यानंतर ज्याला गेली २५ वर्ष कामं नाहीयेत. तो पॅड्या कांबळे, मला कुठले डॉक्टरेट आहात? असं विचारतो. तर पॅड्या तुला एकच सांगतो, तू ‘बिग बॉस’चाही अपमान केला आहेस आणि माझी डॉक्टरेट विचारलीस ना. मी तुझ्यासह सर्व माध्यमांना डॉक्टरेटचे प्रमाणपत्र दाखवतो. पण तू किती पापांचा आहेस, महाराष्ट्रात तुझे किती बाप आहेत, हे सगळे माझ्यापुढे घेऊन ये.”

हेही वाचा – Bigg Boss 18 : हत्येआधी ज्योतिषाने सिद्धू मुसेवालाला केलं होतं सावध; तजिंदर बग्गा यांचा खुलासा, गुणरत्न सदावर्तेंना म्हणाले…

पुढे अभिजीत बिचुकले म्हणाले, “तुझी लायकी किती, उंची किती. मी एक दिवस ‘बिग बॉस’मध्ये असतो ना तर तुला संडासात कोंबुन फ्लश केलं असतं. मी फक्त शाहरुख, आमिर, अभिजीत बिचुकले यांना ओळखतो. मी अवधूत गुप्तेला ओळखतो, निलेश साबळेला ओळखतो. मिलिंद इंगळेला ओळखतो. वैशाली सामंतला ओळखतो आणि श्रावणी देवधर यांना मी काकू म्हणतो. कुठलेही लुंगे सुंगे सांगितली आणि त्याचा राग धरशील. तुला एक सांगतो तू बोलला आहेस म्हणून मी बोलतो. तुझ्या घरात येऊन…तुला बोकड माहीत आहे का?…तुझ्या बापजन्मी बोकड खायला मिळालं का? पीठमाग्या, तुला खायला अन्न नव्हतं…पण तुझ्या घरात येऊन…” पुढे अपशब्दांचा वापर करून अभिजीत बिचुकलेंनी पंढरीनाथवर टीका केली.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi fame abhijeet bichukale criticized on pandharinath kamble pps