छोट्या पडद्यावरील अनेक मालिका आणि चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून अभिजीत केळकरला ओळखले जाते. बिग बॉस मराठीमुळे तो प्रसिद्धीझोतात आला. सध्या तो सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. नुकतंच अभिजीत केळकरने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्याने एका प्रसंगाबद्दल सांगितले आहे.

अभिजीतने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तो आणि त्याची दोन मुलं राधा आणि मल्हार दिसत आहेत. या व्हिडीओला कॅप्शन देताना त्याने “लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा”, असे म्हटले आहे.
आणखी वाचा : महाराष्ट्रात गाजलेलं ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ नाटक रचणार नवा इतिहास, शरद पोंक्षेंची पोस्ट चर्चेत

cutest puppies following traffic rules
Viral Video : ही चाल तुरुतुरु…! रस्ता ओलांडणाऱ्या श्वानाच्या पिल्लांना पाहून नेटकरी पडले प्रेमात; म्हणाले, “फक्त अशी साथ…”
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
heart-touching video | a young man shares the harsh reality of the world
“जेव्हा सर्व साथ सोडतात तेव्हा…” तरुणाने सांगितली खरी दुनियादारी; पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच
Leopard Mother Sacrifices Herself To Protect Her Cubs shocking video
VIDEO: “विषय काळजाचा होता” पिल्लांना वाचवण्यासाठी बिबट्या मादी सिंहाला भिडली; शेवटी आईचं प्रेम जिंकलं की सिंहाची ताकद?
dance video on Tambdi chamdi chamakte unat laka laka song
‘तांबडी चामडी चमकते उन्हात लका लक’ तरुणाने साध्या-भोळ्या आईबरोबर केला जबरदस्त डान्स, Video एकदा पाहाच
genelia deshmukh shares her opinion on parenting
रितेशची बाबा म्हणून जबाबदारी, मातृत्व अन् मुलांचे संस्कार; जिनिलीयाने केलं पालकत्वावर भाष्य, देशमुखांची सून म्हणाली…
Mother saved her daughter from an accident video went viral on social media
हे फक्त आईच करू शकते! चिमुकली रस्त्यावर पळत सुटली अन्…, पुढच्याच क्षणी आईने जे केलं ते पाहून मातृत्वाला कराल सलाम

या व्हिडीओत त्याने एक प्रसंग सांगितला आहे. “काल मी रस्त्याने गाडी चालवत जात होतो. त्यावेळी सिग्नल लागला, म्हणून मी गाडी थांबवली. त्यावेळी शेजारच्या गाडीत एक लहान बाळ होतं. मी त्या बाळाच्या हालचाली पाहत होतो. ते पाहिल्यावर मला तुमचं बालपण आठवलं. तुम्ही तेव्हा माझ्या जवळ नव्हता, त्यामुळे मला तुमची खूप आठवण आली.

राधा लहान असताना कृष्ण कसं म्हणायची, राधाचा पहिला दात कसा आला होता. त्यानंतर तू मला बबा, बबा असे म्हणून हाक मारायचा. मला या गोष्टी नेहमी आठवतात. त्यावेळी मला असं वाटलं की तुम्ही का इतक्या लगेचच मोठे झालात. तुम्ही तसेच लहान लहान असता तर किती बरं झालं असतं?”, असे अभिजीत केळकर त्याच्या मुलांना सांगताना दिसत आहे.

आणखी वाचा : “तू परत आल्याने मालिकेमध्ये…”, अनिता दातेसाठी ‘नवा गडी नवं राज्य’मधील अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली…

यावर अभिजीतची ‘दोन्हीही मुलं मला लहान व्हायचं’, असे विचारताना दिसत आहेत. त्यावर अभिजीत ‘हा कशाला’ असे विचारतो. त्यावर त्याचा मुलगा ‘मग काही अभ्यासच करावा लागणार नाही. फक्त रडलं की सर्व मिळतं’, असे म्हणतो. यावर अभिजीतने ‘अरे बाळांनो पण आपण ज्या वयाचे असतो, त्याची एक वेगळीच मज्जा असते’, असे समजावून सांगतो.

दरम्यान त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहेत. ‘किती गोड’, ‘हुशार मुले’, ‘असा संवाद हवा’, अशा कमेंट या व्हिडीओवर पाहायला मिळत आहेत.