छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून रुचिरा जाधवला ओळखले जाते. ती कायमच चर्चेत असते. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वामुळे ती पुन्हा प्रसिद्धीझोतात आली. रुचिराने माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत माया हे पात्र साकारले होते. त्यानंतर ती अनेक चित्रपटातही झळकली. नुकतंच रुचिराने मराठी आणि हिंदी भाषेबद्दल भाष्य केले.

रुचिरा जाधवने नुकतंच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला प्रादेशिक मनोरंजनसृष्टीतलं काम आणि ओळख निर्माण व्हायला अधिक संघर्ष करावा लागतो का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर तिने थेट उत्तर दिले.
आणखी वाचा- “मला लाखो रुपये दिले तरीही…” रोहितला इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो करण्याबद्दल रुचिरा जाधव स्पष्टच बोलली

marathwada mukti sangram din
Marathwada Liberation Day : मुक्तिसंग्रामानंतरची मराठवाड्याची मानसिक गुंतागुंत!
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
China Sex Camp for wives
पतीनं बाहेर संबंध ठेवू नये म्हणून पत्नींसाठी चीनमध्ये खास शिबिराचं आयोजन, सोशल मीडियावर लोक म्हणाले…
Laxman Hake, OBC, OBC community,
कोणाला पाडायचे – विजयी करायचे ओबीसी समाजाचे ठरले – लक्ष्मण हाके
chhichhore movie has 5 years complete shraddha kapoor share her memories on social media
‘छिछोरे’ सिनेमाला पाच वर्षे पूर्ण! सुशांतबरोबरच्या ‘त्या’ व्हिडीओद्वारे श्रद्धा कपूरचा जुन्या आठवणींना उजाळा, म्हणाली…
Loksatta vyaktivedh Avinash Avalgaonkar Chancellor of Riddhapur Marathi Language University
व्यक्तिवेध: डॉ. अविनाश आवलगावकर
Kiran Mane Post
Kiran Mane Post : “अफजलखान असो वा कृष्णा… औरंग्या असो वा…”, किरण मानेंची पोस्ट चर्चेत!
documentary making, Abhijit Kolhatkar, Shilpa Godbole, producer director duo, documentary, Urdu ghazal, Shashikala Shirgopikar, Reverb Production, passion project, artistic journey
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : अद्यायावतीकरणाचा उद्योग…

“मराठी विरुद्ध हिंदी किंवा इतर प्रादेशिक भाषा अशी तुलना करायला नको असं मला तरी वाटतं. कारण कामासाठी आधी व्यासपीठ मिळणं महत्त्वाचं आहे. हिंदी असो वा मराठी, तुमची ओळख निर्माण करण्यासाठी तुम्हाला तितकाच संघर्ष करावा लागतो”, असे ती म्हणाली.

“सध्या भाषा हा अडसरही राहिलेला नाही. तुम्ही कुठल्याही इंडस्ट्रीत काम करू शकता. त्यामुळं मी तेच ध्येय ठेवलं आहे. उत्तम कथा आणि भूमिका मिळेल, तिथं काम करण्यासाठी मी तयार आहे. सध्या सोशल मीडियामुळे केलेलं काम अधिकाधिक लोकांपर्यंत सहजपणे पोहोचतं. तुम्हाला केवळ मेहनत करायची आहे”, असेही रुचिराने सांगितले.

आणखी वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकार २५ वर्षांपूर्वी कसे दिसायचे? फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क

दरम्यान रुचिरा जाधवने ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत मायाची भूमिका साकारली होती. याच भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली. कलर्स मराठी वाहिनीवरील ‘तुझ्यावाचून करमेना’ या मालिकेत तिने नुपूरची भूमिका साकारली होती. ‘प्रेम हे’, ‘बे दुणे दहा’, ‘माझे पती सौभाग्यवती’ अशा काही मालिकांमध्येही ती झळकली. मालिकांशिवाय रुचिरानं नाटक आणि चित्रपटातही काम केलं आहे.