मराठमोळी अभिनेत्री आणि बिग बॉस फेम सई लोकूर लवकरच आई होणार आहे. सध्या ती तिचे गरोदरपण एन्जॉय करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी सईने पोस्ट शेअर करत गरोदरपणाची माहिती दिली होती. त्यानंतर आता सई तिच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे.
सईने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सई ही बाळाशी बोलताना दिसत आहे. यावेळी तिचे बाळ पोटातून सईला ‘हाय मम्मी’ असा आवाज देत आहे. त्यावर सईदेखील ‘हाय माय बेबी’ असे बोलते. तिने या व्हिडीओलाही ‘हाय माय बेबी’ असे कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : “बाबांनी डोळे फिरवले, तोंडातून फेस येत होता अन्…” प्रार्थना बेहरेने सांगितला ‘तो’ कठीण प्रसंग, म्हणाली “त्यांची नस…”
सईच्या या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यातील एका कमेंटला सईने सडेतोड उत्तर दिले आहे. सईच्या व्हिडीओवर एकाने “किती व्यावसायिकरण करावं, आता बाळाच्या उत्पादनांच्याही जाहिराती करणार का?” अशी कमेंट केली आहे.
त्यावर सईने कमेंट करत उत्तर दिले आहे. “तुमची समस्या नेमकी काय आहे? मी सध्या गरोदर असूनही जाहिरातीच्या निमित्ताने का होईना, काहीतरी काम करतेय. त्यामुळे तुम्ही लोकांवर टीका करणे थांबवा आणि स्वत:साठी काहीतरी काम शोधा”, असे सईने म्हटले आहे.
दरम्यान सई व तिचा पती तीर्थदीप रॉय लवकरच त्यांच्या पहिल्या बाळाचे पालक होणार आहेत. तिने आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे. सईने ‘पारंबी’, ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’, ‘कीस किसको प्यार करु’, ‘जरब’, ‘मी आणि यू’ या चित्रपटात काम केले आहे. त्याबरोबर सई ही बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.