‘वैजू नंबर १’, ‘जुळता जुळता जुळतंय की’, ‘देवमाणूस’ या लोकप्रिय मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सोनाली पाटील नेहमी चर्चेत असते. बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वातील तिचा खेळ पाहून तिचा एक वेगळा चाहता वर्ग तयार झाला आहे. या चाहत्यांबरोबर संपर्कात राहण्यासाठी सोनाली सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. दैनंदिन जीवनातल्या गोष्टी शेअर करत असते. अशातच सोनालीचा भाऊ अभिजीत पाटील आजारी असून तो हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याचं समोर आलं आहे. याबाबत सोनालीनं स्वतः सोशल मीडियावर फोटो शेअर करून माहिती दिली आहे. हा फोटो पाहून तिच्या चाहत्यांमध्ये चिंता पसरली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबला ‘हा’ क्षण आठवला की डोळ्यात येतं पाणी; म्हणाली, “करिअर संपलं…”

सोनाली सोशल मीडियवर नेहमी रील्स आणि फोटो शेअर करत असते. तसेच ती सोशल मीडियावरील व्हायरल ट्रेंडही फॉलो करत असते. तिचे शेतातील काम करताचे रील्स चांगलेच चर्चेत असतात. पण नुकताच तिनं भाऊ अभिजीत पाटीलबरोबरचा हॉस्पिटलमधला फोटो शेअर केला आहे. “माझं प्रेम, लवकर बरा हो,” असं लिहीत तिनं हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सोनालीच्या भावाच्या हाताला आयव्ही ट्यूब लावलेली दिसत आहे. आणि सोनाली भावाबरोबर बोलताना पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – दहीहंडी सरावात सहभागी होऊन मराठमोळ्या अभिनेत्यानं लुटला आनंद; व्हिडीओ शेअर करत गोपाळ मित्रांना केली विनंती, म्हणाला…

हेही वाचा – “तुमचा लेखक कुठे आहे?” ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’चा नवा प्रोमो पाहून प्रेक्षक संतप्त; म्हणाले…

सोनालीनं भावाबरोबर शेअर केलेला फोटो पाहून तिच्या एका चाहतीनं प्रतिक्रियेत लिहीलं आहे की, ‘लवकरच तो बरा होईल. त्याच्यावर देवाची कृपा राहो.’ तर दुसऱ्या चाहतीनं लिहीलं आहे की, ‘तुझ्यावर स्वामींची कृपा राहो.’ तसेच तिसऱ्या चाहत्यानं लिहीलं आहे की, ‘सोनाली ताई काय झालं?’

हेही वाचा – ‘रंग माझा वेगळा’ फेम रेश्मा शिंदेसाठी संपूर्ण मालिकेतील ‘हा’ सीन होता चॅलेजिंग; म्हणाली, “मला रात्री…”

दरम्यान, सोनालीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिनं फक्त मराठी मालिकामध्येच काम केलं नसून हिंदी मालिकेतही ती झळकली आहे. ‘वागले की दुनिया’ या हिंदी मालिकेत ती दिसली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi fame actress sonali patil brother admitted to hospital pps