छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे अक्षय केळकर. बिग बॉसच्या चौथ्या पर्वाचा तो विजेता ठरला. नुकतंच अक्षयने त्याच्या रक्षाबंधनाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अक्षयच्या बहिणीचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला होता. नुकतंच अक्षयने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्याची बहीण छान नऊवारी साडी परिधान करत अक्षयच्या हातावर राखी बांधत असल्याचे दिसत आहे. यावेळी तिने त्याला सुंदर भेटवस्तूही दिली.

अक्षय केळकरची पोस्ट

“बहीण सासरी गेल्या नंतरचं पहिलं रक्षाबंधन….एकदम अचानक मोठी झालीस ग… फालतू भांडण करुन थयथयाट घालणारी हीच मुलगी.. यावेळी हिने माझासाठी गिफ्ट आणलं…. !!! असो…. याहून जास्त कौतुक नाही करणारे मी”, असे कॅप्शन अक्षय केळकरने या व्हिडीओला दिले आहे.

दरम्यान अक्षय केळकर हा सध्या ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. अक्षय केळकर हा कायमच त्याच्या कुटुंबाला प्राधान्य देताना दिसतो. तो बिग बॉसच्या घरातही आई, बाबा आणि बहीण यांच्याबद्दल बोलताना पाहायला मिळाला.