रक्षाबंधनाचा सण झाला की भावा-बहिणींना प्रतिक्षा असते ती भाऊबीज सणाची. दिवाळी पाडवा झाल्यानंतर भाऊबीज साजरी केली जाते. या दिवशी बहिणी भावाला ओवाळते. तसंच त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. त्यामुळे आज सर्वत्र भाऊबीज साजरी केली जात आहे. कलाकार मंडळीदेखील भाऊबीज साजरी करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर कलाकार मंडळींनी भाऊबीजचे फोटो, व्हिडीओ शेअर केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात झळकलेल्या लोकप्रिय अंकिता वालावलकरने काही दिवसांपूर्वी भाऊबीज साजरी केली. कोल्हापुरचा ढाण्या वाघ म्हणजेच धनंजय पोवारबरोबर अंकिताने भाऊबीज साजरी केली. होणाऱ्या नवऱ्याबरोबर धनंजय पोवारच्या घरी अंकिता गेली होती.

हेही वाचा – Video: ‘सावळ्याची जणू सावली’ फेम वीणा जगतापने मेघा धाडेला दिवाळीनिमित्ताने दिलं खास गिफ्ट, व्हिडीओ होतोय व्हायरल

आधी अंकिता धनंजय पोवारच्या फर्निचरच्या दुकानात त्याला सरप्राइज देण्यासाठी गेली. त्यानंतर ती धनंजयच्या घरी गेली होती. यावेळी तिने धनंजयला ओवाळून एक हटके गिफ्ट दिलं. ज्याचा व्हिडीओ तिने नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा – Video: ‘आई कुठे काय करते’ फेम रुपाली भोसलेने दिवाळीच्या मुहूर्तावर घेतली नवी आलिशान गाडी, पाहा व्हिडीओ

“वेळ नाही सांगून सतत बायकोला फक्त कोकण फिरवणाऱ्या माझ्या भावाला भाऊबीजेच्या निमित्ताने एकच विनंती की वहिनीला काश्मिर फिरायला घेऊन जा”, असं कॅप्शन लिहित अंकिता वालावलकरने हटके गिफ्टचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सुरुवातीला अंकिता समुद्र किनारी धनंजयसाठी खास गिफ्ट घेताना दिसत आहे. त्यानंतर ती म्हणते, “डीपी दादा बायकोला फक्त कोकणात फिरवायला घेऊन जातात आणि वहिनी मला सांगतात, अगं मला मासे आवडता.” म्हणून त्यांच्यासाठी युनिट गिफ्ट घेऊन भाऊबीजेला भेटायला आले. अंकिताने दिलेले युनिक गिफ्ट म्हणजे कोकणातले मासे आहेत.

या व्हिडीओच्या प्रतिक्रियेतही अंकिताने धनंजयला टॅग करत लिहिलं आहे, “काश्मिर ट्रीपचा कधी प्लॅन करून देऊ? आता तर न्हावचं लागले.” यावर डीपी म्हणाला, “डन” त्यानंतर अंकिता म्हणाली, “मतावर ठाम राहा.”

अंकिता वालावलकर आणि धनंजय पोवारच्या प्रतिक्रिया

हेही वाचा – सातत्याने येणाऱ्या धमक्यांदरम्यान सलमान खान पोहोचला हैदराबादमध्ये; भाईजान ताज फलकनुमा पॅलेसमध्ये करणार ‘सिकंदर’ चित्रपटाचं चित्रीकरण

दरम्यान, अंकिता वालावलकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. संगीत दिग्दर्शक कुणाल भगतशी अंकिता लग्नगाठ बांधणार आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घराबाहेर पडल्यानंतर अंकिताने प्रेमाची कबुली दिली होती. पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सिंधुदुर्गात अंकिता कुणाली लग्न करणार आहे. अंकिताचा होणारा नवरा कुणाल हा देखील कोकणातला असून माणगाव येथील आहे. दोघांचं ‘आनंदवारी’ हे गाणं एकत्र केलं होतं. गेल्या कित्येक वर्षांपासून दोघं एकमेकांना ओळख होते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi fame ankita walawalkar fish gift to dhananjay powar for bhaubij pps