‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वात झळकलेला लोकप्रिय डिजिटल क्रिएटर अदनान शेख ( Adnaan Shaikh Wedding ) लग्नबंधनात अडकणार आहे. सध्या त्याचे लग्नाआधीचे कार्यक्रम जोरदार सुरू आहेत; ज्याचे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. एका व्हिडीओमध्ये ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातून नुकताच बाहेर पडलेला अरबाज पटेल ( Arbaz Patel ) पाहायला मिळाला. या व्हिडीओमध्ये अरबाज जबरदस्त डान्स करताना दिसला.
लोकप्रिय डिजिटल क्रिएटर अदनान शेख आणि अरबाज पटेल हे दोघं चांगले मित्र आहेत. २० सप्टेंबरपासून अदनानच्या लग्नासोहळ्याला सुरुवात झाली आहे. २२ सप्टेंबर अदनानला हळद लागली. त्यानंतर संगीत सोहळा पार पडला. या संगीत सोहळ्याला अनेक लोकप्रिय डिजिटल क्रिएटर्सनी हजेरी लावली होती. तसंच अरबाज पटेल देखील आपल्या खास मित्राच्या संगीत सोहळ्यात पाहायला मिळाला.
हेही वाचा – Bigg Boss Marathi : लग्नाबद्दल विचारताच अरबाज पटेल लाजला अन् म्हणाला, “आता तर…”
अदनानच्या संगीत सोहळ्यात काही पत्रकारांनी अरबाजला ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील प्रवासाविषयी विचारलं. तेव्हा अरबाज म्हणाला, “‘बिग बॉस मराठी’चा प्रवास खूप भारी होता. एवढ्या लवकर प्रवास संपेल असं वाटतं नव्हतं. ठीक आहे. पुढे अजून बरंच काही करायचं आहे.” याशिवाय तो मजेत म्हणाला की, अदनानच्याच लग्नासाठी मी ‘बिग बॉस’च्या घराबाहेर आलो आहे. सध्या अदनानच्या संगीत सोहळ्यातील अरबाजच्या डान्स व्हिडीओ सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
हेही वाचा – “मी ही सूरजसारखा तळागाळातून आलोय…”, अरबाज पटेलचं वक्तव्य, म्हणाला, “त्याच्याकडे गेम नाहीये, पण…”
या व्हिडीओमध्ये, अदनानच्या संगीत सोहळ्यात अरबाज पटेल आपल्या मित्रांबरोबर जबरदस्त डान्स करताना पाहायला मिळत आहे. शाहरुख खान आणि मलायका अरोराचं लोकप्रिय गाणं ‘छैया छैया’वर अरबाज मित्रांबरोबर डान्स करताना दिसत आहे. फुल्ल एनर्जेटिक डान्स अरबाजचा पाहायला मिळत आहे.
हेही वाचा – Video: घटस्फोटाच्या चर्चांना ऐश्वर्या राय-बच्चनने ‘असं’ दिलं उत्तर, पाहा व्हिडीओ
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा सध्या नववा आठवडा सुरू आहे. या आठवड्यात ‘बिग बॉस’ने घरात राहिलेल्या आठही सदस्यांना थेट नॉमिनेट केलं आहे. त्यामुळे या आठ सदस्यांपैकी कोणत्या सदस्याचा घराबाहेर जाण्यापासून बचाव होतोय? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तसंच ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व १०० दिवसांच्या ऐवजी ७० दिवसांचं असणार आहे. त्यामुळे येत्या काळात आठ सदस्यांमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे.