Bigg Boss Marathi Dhananjay Powar & Ankita Walawalkar : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वामुळे धनंजय पोवार आणि अंकिता वालावलकर ही भावा-बहिणीची जोडी महाराष्ट्राच्या घराघरांत लोकप्रिय झाली. या दोघांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. शोमध्ये अंकिता धनंजयला ‘डीपी दादा’ म्हणायची. आता ‘बिग बॉस’ संपून अनेक महिने उलटून गेल्यावरही या दोघांची मैत्री कायम आहे. अंकिताच्या घरी सध्या तिची लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. डीपी दादा सुद्धा आपल्या बहिणीच्या लग्नासाठी प्रचंड उत्सुक आहेत.
गेल्या काही दिवसांपासून अंकिता लग्नानिमित्त विविध ठिकाणी शॉपिंग करत असल्याचं पाहायला मिळत आहे. तिचा सगळा वेळ धावपळीत जात असल्याच्या अनेक इन्स्टाग्राम स्टोरी ती शेअर करत असते. या सगळ्यात धनंजयने शेअर केलेल्या एका खरेदी करतानाच्या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
हेही वाचा : Video: न्यू इअरचं सेलिब्रेशन करून रणबीर कपूर-आलिया भट्ट राहासह मुंबईत परतले, एअरपोर्टवरील व्हिडीओ व्हायरल
धनंजय पोवारने अंकिताबरोबरचा एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये ‘कोकण हार्टेड गर्ल’ कपड्यांची खरेदी करत असताना, डीपी दादा जमिनीवर बसून तिची वाट बघत असल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडीओला डीपीने, “जेव्हा आपली बहीण खरेदी करत असते… कपडे खरेदी करायला गेल्यावर सकाळी ११ वाजल्यापासून रात्री ११ वाजले तरी आम्हाला सोडत नव्हती” असं मजेशीर कॅप्शन दिलं आहे.
नेटकऱ्यांसह मराठी कलाकारांनी या व्हिडीओच्या कमेंट्समध्ये प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण, यावर अंकिताची कमेंट या सगळ्यात लक्ष वेधून घेणारी आहे.
धनंजयने हा मजेशीर व्हिडीओ शेअर करत ‘बहिणीची शॉपिंग’ असं म्हटलं होतं. पण, अंकिता म्हणते, “खरेदी वहिनींसाठी होती ते पण सांगा… बायकोच्या खरेदीला तोंड वाकडं केलं. कल्याणी वहिनी बघा जरा…” यावर डीपीने “लाव भांडणं तू” असं उत्तरं दिलं आहे.
दरम्यान, डीपी आणि अंकिताच्या ( Bigg Boss Marathi ) या मजेशीर व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. तर, या व्हिडीओला अवघ्या दोन दिवसात २० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यावरुन या दोघांची क्रेझ स्पष्टपणे दिसून येते.