मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता किरण माने ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वामुळे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. तल्लख बुद्धीच्या जोरावर किरण मानेंनी ‘बिग बॉस’च्या खेळात डावपेच आखत टॉप ५मध्ये त्यांचं स्थान निश्चित केलं होतं. घरातील ते एक स्ट्राँग स्पर्धक होते. परंतु, ‘बिग बॉस’च्या चौथ्या पर्वात त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं.

‘बिग बॉस’च्या घरातील त्यांच्या खेळीने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात येण्याआधी किरण माने ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत होते. परंतु, अचानक त्यांना मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. त्यानंतरही ते अनेक दिवस चर्चेत होते. ‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व संपल्यानंतर किरण मानेंनी ‘ईटाइम्स’ला मुलाखत दिली. यामुलाखतीत त्यांनी ‘मुलगी झाली हो’ मालिकेबाबतही भाष्य केलं.

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Atul Subhash Suicide Note last 12 wishesh
Atul Subhash Suicide: अतुल सुभाष यांच्या सुसाइड नोटमध्ये अनेक धक्कादायक दावे, शेवटच्या १२ इच्छा व्यक्त करताना न्यायव्यवस्थेवर केली टीका
Priya Berde
प्रिया बेर्डे यांना भविष्यात साकारायचीय ‘ही’ व्यक्तिरेखा, म्हणाल्या, “माझ्या आईने…”
soldier in Air Force committed suicide by shooting himself in head on duty
थरारक… वायुसेनेच्या जवानाची आत्महत्या, कर्तव्यावर तैनात असताना डोक्यात घातली गोळी अन्…
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
Atul Suhas Suicide
“न्याय प्रलंबित आहे”, गळ्यात फलक लटकावून तरुणाची आत्महत्या; २४ पानी नोटमुळे पोलिसांसमोर आव्हान वाढले!

हेही वाचा>> उर्फी जावेदने कचऱ्याच्या पिशवीपासून बनवला ड्रेस, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

किरण मानेंना मुलाखतीत ‘मुलगी झाली हो’ मालिकेबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ते म्हणाले, “’मुलगी झाली हो’ मालिकेतून बाहेर काढल्यानंतर माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं होतं. काही सहकलाकारांनी माझ्यावर आरोप केले होते. यामुळे माझं मानसिक संतुलन बिघडत होतं. यामुळे मी नैराश्यात गेलो होतो. माझ्यावर चुकीचे आरोप झाल्यामुळे मला कामही मिळत नव्हतं. एक वेळ अशी आली होती, जेव्हा माझ्या मनात आत्महत्येचे विचार येत होते. आत्महत्या करुन जीवन संपवून टाकावं असं मला वाटत होतं”.

हेही वाचा>> ‘तारक मेहता…’ मालिकेत दयाबेनची एन्ट्री होणार, दिशा वकानी व ‘बाघा’चा फोटो व्हायरल

किरण मानेंनी ‘बिग बॉस मराठी’बाबतही भाष्य केलं. “मला बिग बॉस मराठी ४च्या संपूर्ण टीमचे आभार मानायचे आहेत. मला या शोची खूप गरज होती. कॅमेऱ्यासमोर येण्याची संधी मी शोधत होतो. ‘बिग बॉस’च्या टीमने मला ती संधी दिली”, असं ते म्हणाले.

Story img Loader