मराठी अभिनेता किरण माने ‘बिग बॉस मराठी’ शोमुळे प्रसिद्धीझोतात आले. या शोमधून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. तल्लख बुद्धीने किरण मानेंनी घरातील सदस्यांसह प्रेक्षकांनाही त्यांची दखल घ्यायला भाग पाडलं होतं. उत्तम खेळी करत किरण मानेंनी ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाच्या टॉप ५ फायनलिस्टमध्ये स्थान मिळवलं होतं. परंतु, त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर किरण मानेंना प्रेक्षकांकडूनही भरभरुन प्रेम मिळालं. आता किरण माने त्यांच्या चाहत्यांसाठी एक खूशखबर घेऊन आले आहेत. लवकरच माने नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. किरण मानेंना लॉटरी लागली आहे. दिग्दर्शक महेश मांजरेकरांच्या प्रोजेक्टमध्ये ते सध्या काम करत आहेत. मानेंनी त्यांच्या सोशल मीडियावरुन सेटवरील एक फोटो शेअर केला आहे.

हेही वाचा>> Video: “बीएमडब्ल्यू, मर्सिडीज बेन्झ…” आदिलने वाचला राखी सावंतकडे असलेल्या गाड्यांचा पाढा, जुना व्हिडीओ व्हायरल

“‘वास्तव’ हे हाय की, आता ‘कॅमेरा’ माझी आन् मी कॅमेर्‍याची पाठ सोडत नसतोय. मी येतोय भावांनो…लवकरच…एका नादखुळा भुमिकेत…वुईथ ‘द महेश मांजरेकर’! अपनी कुर्सी की पेटी बांध लीजिए…मौसम बिगड़ने वाला है…” असं कॅप्शन मानेंनी पोस्टला दिलं आहे. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा>> Video: सिद्धार्थ-कियाराने लग्नानंतर वाटली मिठाई; अभिनेत्रीच्या साध्या मंगळसूत्राने वेधलं लक्ष

किरण मानेंनी अनेक नाटक व मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘मुलगी झाली’ हो मालिकेतील त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या मालिकेतून अचानक काढण्यात आल्याने ते चर्चेतही आले होते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi fame kiran mane to play important role in mahesh manjarekar project kak