‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व संपून महिना उलटला असला तरी चर्चा मात्र कायम आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण ठरला असला तरी सर्व सदस्य जोरदार चर्चेत आहेत. विविध कार्यक्रमांमध्ये ‘बिग बॉस मराठी’मध्ये झळकलेले सदस्य पाहायला मिळत आहेत. तसंच सातत्याने हे सदस्य एकमेकांच्या भेटीगाठी घेताना दिसत आहेत. अशातच या पर्वातील निखिल दामलेने आलिशान गाडी खरेदी केली आहे. याचा व्हिडीओ त्याने नुकताच शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाच्या तिसऱ्या आठवड्यात निखिल दामले योगिता चव्हाणसह एलिमिनेट झाला होता. घराबाहेर जाताना निखिलने मॅच्युअल फंड कॉइनचा वारसदार डीपी दादा म्हणजे धनंजय पोवारला केलं होतं. एकंदरीत ‘बिग बॉस मराठी’च्या घरात निखिलचा खेळ जास्त पाहायला मिळाला नव्हता. त्यामुळे रितेश देशमुखने त्याला खूप झापलं होतं. घरात जुळे भाऊ आहेत. एक निखिल आणि दुसरा दामले, असं म्हणत रितेशने त्याची कानउघडणी केली होती. पण तरीही निखिलचा खेळ पाहायला मिळाला नाही. असं असलं तरी ‘बिग बॉस मराठी’मुळे निखिल प्रसिद्धीच्या झोतात आला आहे.

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ मालिका संपल्यानंतर रुपाली भोसलेला ‘या’ व्यक्तीची येईल आठवण, म्हणाली, “त्यांच्याशी जितकी…”

नुकताच निखिल दामलने नव्या आलिशान गाडीचा व्हिडीओ शेअर केला आहे. “नव्या सदस्याचं स्वागत आहे”, असं कॅप्शन निखिलने व्हिडीओवर दिलं आहे. या व्हिडीओमध्ये निखिल आपल्या स्वप्नातल्या गाडीची पूजा करताना दिसत आहे. यावेळी अभिनेत्याबरोबर कुटुंबातील सदस्य आहेत.

हेही वाचा – Video: जिना उतरताना जोरात पडला विजय देवरकोंडा, व्हिडीओ होतोय व्हायरल

निखिल दामलेचा हा व्हिडीओ पाहून ‘बिग बॉस मराठी’तील सदस्यांसह इतर कलाकार मंडळी शुभेच्छा देताना दिसत आहेत. पुरुषोत्तमदादा पाटील, अभिजीत सावंत, सौरभ चौघुले, सानिया चौधरी, समृद्धी केळकर, ऐश्वर्या शेटे अशा अनेक कलाकारांनी निखिल दामलेवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सौरभने चौघुले शुभेच्छा देत “चला पार्टीला” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – Bigg Boss 18: हृतिक रोशनच्या लाइफ कोचला दाखवला ‘बिग बॉस’च्या घराबाहेरचा रस्ता, ‘हे’ सदस्य झाले सुरक्षित

दरम्यान, निखिल दामलेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘हृदयात वाजे समथिंग’, ‘अलमोस्ट सुफळ संपूर्ण’, ‘यशोदा’, ‘रमा राघव’ या मालिकांमध्ये तो विविधांगी भूमिकेत झळकला. ‘रमा राघव’ या मालिकेनंतर निखिल ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात पाहायला मिळाला.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi fame nikhil damle bought new car watch video pps