‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व संपल्यापासून एका जोडीची सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात बनलेली ही जोडी सध्या बहुचर्चित जोडी झाली आहे. सतत एकमेकांचा हातात हात घेऊन निक्की आणि अरबाज फिरताना दिसतात. ‘बिग बॉस मराठी’नंतर दोघांचे एकत्र अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशातच दिवाळी निमित्ताने निक्कीने अरबाजबरोबर शेअर केलेला व्हिडीओ सध्या खूप व्हायरल झाला आहे. तसंच या व्हिडीओवर राखी सावंतने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“झगमगत्या रात्रीची दिवाळी आली”, असं कॅप्शन देत निक्की तांबोळीने अरबाज पटेलबरोबर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये निक्की आणि अरबाज दोघं काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये पाहायला मिळत आहे. यात दोघं खूप सुंदर दिसत आहेत. व्हिडीओमध्ये पणती घेऊन निक्की आणि अरबाज वेगवेगळ्या पोज देत आहेत. या व्हिडीओमागे सलमान खान आणि सोनम कपूरचं ‘जलते दिये’ हे गाणं लावलं आहे.

हेही वाचा – “१४ वर्षांचा अपत्यप्राप्तीसाठीचा वनवास यंदाच्या दिवाळीत संपला”, अभिनेत्री तेजस्विनी पंडित झाली मावशी; म्हणाली, “लक्ष्मी आली”

निक्की तांबोळी आणि अरबाज पटेलचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत २२ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून एक हजारांहून अधिक जणांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडीओवर काही नेटकऱ्यांनी दोघांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी खोचक प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण, यामध्ये राखी सावंतच्या प्रतिक्रियेने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

निक्की आणि अरबाजच्या या व्हिडीओवर राखी सावंतने हसण्याचे इमोजी देऊन दोघांचं अभिनंदन केलं आहे. राखीच्या सावंतच्या प्रतिक्रियेवर अनेक नेटकरी व्यक्त झाले आहेत. “राखीलाच यांच्याबद्दल सर्व काही माहित असेल”, “राखी सावंत रॉक्स”, “राखीची प्रतिक्रिया भारी आहे”, “एक नंबर राखी”, “राखीला चांगलंच माहित आहे पुढे काय होणार आहे”, “राखीने इमोजीसह सुपर प्रतिक्रिया दिली”, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या उमटल्या आहेत.

राखी सावंतची प्रतिक्रिया

हेही वाचा – Bigg Boss 18: चौथ्या आठवड्यात ‘हा’ सदस्य झाला एलिमिनेट, घराबाहेर जाण्यापासून शिल्पा शिरोडकरसह सुरक्षित झाले ‘हे’ सहा सदस्य

दरम्यान, काही दिवसांपूर्वी निक्की तांबोळीने ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणला व्हिडीओ कॉल केला होता. यावेळी तिच्याबरोबर अरबाजदेखील होता. निक्की सूरजबरोबर झालेल्या व्हिडीओ कॉलचा स्क्रीनशॉर्ट सोशल मीडियावर शेअर करत म्हणाली होती, “भावा लवकरच भेटूयात…”

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi fame nikki tamboli and arbaaz patel shared a special video on occasion of diwali rakhi sawant comment viral pps