Nikki Tamboli Arbaz Patel: ‘बिग बॉस मराठी ५’ फेम अभिनेत्री निक्की तांबोळी सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. ‘बिग बॉस मराठी’मध्ये निक्की व अरबाज यांची जवळीकता शोमध्ये पाहायला मिळाली होती, त्यानंतर हे दोघे बरेचदा एकत्र दिसायचे; मात्र ते फक्त मित्र असल्याचं म्हणत होते. अखेर निक्कीने प्रेमाची कबुली दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल एकमेकांना डेट करत आहेत. व्हॅलेंटाईन डेच्या आधीच निक्कीने अरबाजला डेट करत असल्याचं सांगितलं. निक्की म्हणाली, णि रिलेशनशिपसाठी कोणीतरी आयुष्यात येईल याची वाट पाहत होते. जेव्हा मी अरबाजला भेटले तेव्हा मला लगेचच कनेक्शन जाणवलं. आमच्यातील प्रेम हे मैत्रीपेक्षा जास्त आहे, ही गोष्ट मी नाकारणार नाही.”

रोमान्स म्हणजे महागड्या भेटवस्तू नाही – निक्की

निक्की व अरबाज व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी लंडनला जाणार होते, पण निक्की सध्या ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. “आम्ही कुठेही असलो तरीही सेलिब्रेशनचे पर्याय नेहमी शोधत असतो. माझ्यासाठी रोमान्स म्हणजे महागड्या भेटवस्तू नाहीत, तर त्या व्यक्तीचं जवळ असणं आणि एकमेकांना समजून घेणं आहे,” असं निक्की म्हणाली.

अरबाजला निक्कीबद्दल म्हणाला, “तिच्यात खूप आत्मविश्वास आहे. पण मी तिचा दयाळू स्वभाव पाहून प्रेमात पडलो. ती मनापासून काळजी घेणारी आहे, नेहमी तिच्या आवडत्या लोकांच्या पाठीशी उभी राहते. ती मला दररोज चांगली व्यक्ती होण्यासाठी प्रेरित करते.” निक्कीनेही अरबाजचं कौतुक केलं. “अरबाजमुळे मला सुरक्षित वाटतं. तो मला खूप समजून घेतो. तो संयमी आहे, मला खूप सपोर्ट करतो, तसेच मला बदलण्याचा कधीही प्रयत्न करत नाही. त्याचा शांतपणा, त्याचं माझ्या आयुष्यात असणं यामुळे खरं प्रेम कसं असतं ते मला समजलं,” असं निक्की म्हणाली.

निक्की व अरबाजला लग्नाबद्दल विचारण्यात आलं. त्यावर “लग्नाबद्दल आताच बोलणं खूप घाईचं ठरेल,” असं ते म्हणाले. “आम्हाला कामावर लक्ष केंद्रित करून आयुष्यात पुढे जायचं आहे. आम्हाला एकमेकांसाठी आणि आमच्या कुटुंबासाठी वेळ काढायचा आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही एकत्र आनंदी आहोत आणि त्यामुळे आम्ही कोणत्याही गोष्टीची घाई करत नाही. आता आम्ही एक कपल म्हणून आमच्या या प्रवासाचा आनंद घेत आहोत,” असं निक्कीने सांगितलं.

“सध्या तरी आम्ही लग्नाचा विचार करत नाहीयोत. आम्ही फक्त या प्रेमाच्या प्रवासाचा आनंद घेत आहोत,” असं अरबाज म्हणाला.