Nikki Tamboli Video Viral : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वामुळे मराठमोळी निक्की तांबोळी घराघरांत पोहोचली. निक्कीने काही दाक्षिणात्य चित्रपटही केले आहेत. आता ती ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोचा एक प्रोमो व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये निक्की ढसाढसा रडताना दिसत आहे, त्यामुळे निक्कीला नेमकं झालंय तरी काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

सोनी टीव्हीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’चा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये ती रडताना दिसते. “मागील तीन वर्षांत मी हिट रिअॅलिटी शो दिले आहेत, पण तरीही मी खूश नाहीये. मी आनंद शोधतेय,” असं निक्की रडत रडत म्हणते. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांच्या डोळ्यांतही पाणी येतं. त्यानंतर शेफ रणवीर ब्रार व फराह खान निक्कीशी बोलताना दिसतात.

Dhartiputra Nandini fame actor Aman Jaiswal dies in road accident
‘धरतीपुत्र नंदिनी’ फेम अभिनेता अमन जैस्वालचे अपघाती निधन, ट्रकने दिली धडक
Premachi Goshta Fame Apurva Nemlekar
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत आलेल्या नव्या मुक्ताबद्दल सावनी काय…
Tula Shikvin Changalach Dhada New Promo
अक्षरा पुन्हा पोहोचली सासरी! भुवनेश्वरीशी होणार मोठा वाद; तर, अधिपतीच्या मनात ‘ही’ व्यक्ती विष कालवणार, पाहा प्रोमो
Aishwarya & Avinash Narkar Son amey narkar
ऐश्वर्या नारकरांच्या मुलाला पाहिलंत का? परदेशात पूर्ण करतोय शिक्षण, इंडस्ट्रीत येण्याआधी आईने दिलाय ‘हा’ महत्त्वाचा सल्ला, म्हणाल्या…
Bigg Boss 18 Grand Finale Live Streaming in Marathi
Bigg Boss 18 Grand Finale: बिग बॉस १८ चा ग्रँड फिनाले केव्हा, कुठे पाहायचा; विजेत्याला बक्षीस काय मिळणार? वाचा
star pravah aboli serial pratiksha lonkar exit
‘स्टार प्रवाह’च्या ‘अबोली’ मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्रीने घेतली एक्झिट! आता रमाच्या भूमिकेत कोण झळकणार? पाहा व्हिडीओ
shilpa shirodkar on namrata shirodka mahesh babu
Bigg Boss 18 : शिल्पा शिरोडकरने बहीण नम्रता व तिचा पती महेश बाबूकडून पाठिंबा न मिळण्याबद्दल सोडलं मौन; म्हणाली, “मला…”
Tula Shikvin Changlach Dhada
Video: “सूनबाई जर…”, भुवनेश्वरीमुळे अधिपतीला भेटण्याची अक्षराची इच्छा अपूर्ण राहणार का? मालिकेत पुढे काय घडणार?
Aata Hou De Dhingana Season 3
Video: ‘आता होऊ दे धिंगाणा ३’च्या मंचावर अद्वैतने कलासाठी आणली सवत; पतीला जिंकण्यासाठी कला लावतेय ताकद…; व्हिडीओ व्हायरल

निक्कीला ती काय बनवतेय, असं ते विचारतात. त्याचं निक्की उत्तर देते. यावेळी निक्की गोंधळलेली दिसते. चिप्स कुठे आहेत, असं रणवीर तिला विचारतात. त्यावर ती बनवू शकली नाही असं उत्तर देते. हे ऐकून फराह खान व विकास खन्ना यांना धक्का बसतो.

पाहा व्हिडीओ –

पुढे निक्की रडत म्हणते, “मी खूप मेहनत करतेय, मला शो मिळत आहेत, पण मी खूश नाहीये. कधी कधी मला वाटतं की मी या सगळ्या गोष्टींसाठी पात्र नाही.” निक्कीचं बोलणं संपल्यावर हा प्रोमो संपतो. निक्की नेमकी कशामुळे रडते, काय घडलंय, ते एपिसोड प्रसारित झाल्यावरच कळेल.

निकी तांबोळीच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तिने मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात केली होती. २०१९ मध्ये, तिने ‘चिकाती गडिलो चिथाकोटुडू’ या तेलुगू हॉरर कॉमेडी चित्रपटातून अभिनयात पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने ‘कांचना ३’ या ॲक्शन हॉरर चित्रपटातून तमिळमध्ये पदार्पण केले होते. तिचा तिसरा चित्रपट ‘थिप्पारा मीसम’ होता.

निक्की २०२० मध्ये बिग बॉस १४ या हिंदी रिॲलिटी शोमध्ये सहभागी झाली होती. यामध्ये ती तिसऱ्या क्रमांकावर राहिली होती. त्यानंतर तिने यंदा ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात भाग घेतला. मराठीतही ती तिसऱ्या क्रमांकावर राहिली होती. आता ती पंजाबी चित्रपटातील एका गाण्याच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निक्कीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास ती सध्या बिग बॉस मराठी फेम अरबाज पटेलला डेट करत आहे.

Story img Loader