Nikki Tamboli : बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वातील सर्वात चर्चेत राहिलेल्या स्पर्धकांपैकी एक म्हणजे निक्की तांबोळी होय. निक्कीची घरातील इतर स्पर्धकांशी भांडणं असो वा अरबाज पटेलबरोबरचं तिचं नातं असो, या सगळ्या गोष्टींची खूप चर्चा झाली. अभिनेत्री निक्की तांबोळी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. शो संपल्यावरही ती अनेक फोटो व व्हिडीओ तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत असते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निक्की तांबोळी सध्या तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आहे. निक्कीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. तो व्हिडीओ पाहून तिला नेटकरी ट्रोल करत आहेत. निक्की तांबोळीने बोल्ड कपड्यांमध्ये फोटोशूट करतानाचा एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तिला ट्रोल करणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत. मराठी मुलगी असूनही असे व्हिडीओ शेअर करतेस अशा कमेंट्स तिच्या व्हिडीओवर आहेत.

हेही वाचा – ‘वन नाईट स्टँड’साठी मद्यधुंद अवस्थेत पार्टीत शिरली, नशेतच त्याच्या कुटुंबाला…; कपूर कुटुंबाच्या सूनेने सांगितली लव्ह स्टोरी

‘तू मराठी आहेस, ही आपली संस्कृती नाही’, ‘बाई काय हा प्रकार’, ‘आजकाल अंगप्रदर्शन करणं हे प्रसिद्धी मिळवण्याचं माध्यम झालंय,’ ‘ही अशी पद्धत नाही मराठी मुलींची’, अशा कमेंट्स या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

निक्कीच्या पोस्टवरील कमेंट
निक्कीच्या पोस्टवरील कमेंट
निक्कीच्या पोस्टवरील कमेंट
निक्कीच्या पोस्टवरील कमेंट
निक्कीच्या पोस्टवरील कमेंट

दरम्यान, निक्की तांबोळीबद्दल बोलायचं झाल्यास ती बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात तिसऱ्या क्रमांकावर राहिली. या शोचा विजेता रीलस्टार सूरज चव्हाण ठरला होता, तर उपविजेता अभिजीत सावंत ठरला.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi fame nikki tamboli trolled over bold video netizens says this is not marathi culture hrc