देशभरात आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जल्लोषात साजरी केली जात आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन ठिकठिकाणी करण्यात आलं आहे. सोशल मीडियाद्वारे लोक शिवजयंतीच्या शुभेच्छा देत महाराजांचे विचार, त्यांच्या शौर्याला उजाळा देत आहेत. कलाकार मंडळी देखील आपल्या चाहत्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत.
‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात झळकलेली अभिनेत्री रुचिरा जाधव हिने अनोख्या अंदाजात शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने शुभेच्छा देत ‘बिग बॉस’च्या घरात घडलेला एक प्रसंग सांगितला आणि शेवटी ती म्हणाली, “कोणासमोर झुकायचं, कोणासमोर नाही हेच जर कळलं नाही, तर काय शिकलो आपण महाराजांकडून…मुजरा राजे…जय शिवराय.” रुचिराबरोबर ‘बिग बॉस’ घरात नेमकं काय घडलं होतं? जाणून घ्या..
हेही वाचा – Video: चालू सीनमध्ये जेव्हा अभिनेत्री तेजश्री प्रधान डायलॉग विसरते तेव्हा…, पाहा व्हिडीओ
रुचिरा काही फोटो शेअर करत म्हणाली की, शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा… शिवजयंतीच्या निमित्ताने एक आठवण शेअर कराविशी वाटते. ‘बिग बॉस’च्या घरात असताना दर आठवड्याला एंटरटेनमेंट डेच्या दिवशी कोणी ना कोणी पाहुणे येत असतं. असंच एका शुक्रवारी एक प्रतिष्ठित व्यक्ती आली होती, जी स्वतः कलाकार होती. तसेच राजकारणाशी सुद्धा संबंधित होती. कार्यक्रम झाल्यावर त्यांना आदराने निरोप देताना आमच्यापैकी एकाने कोणीतरी “ए चला, त्यांना मुजरा करूया” असं म्हटलं. मग काय, सगळ्यांनी वाकून मुजरा केला. मी मात्र तशीच उभी होते. मला विचारलं, तू का मुजरा केला नाहीस, मी म्हटलं, “मुजरा फक्त महाराजांना”
पुढे अभिनेत्रीने लिहिलं आहे, “तत्व म्हणजे तत्व. दिखावा मला कधी जमला नाही आणि जमणार ही नाही…आणि कोणासमोर झुकायचं, कोणासमोर नाही हेच जर कळलं नाही, तर काय शिकलो आपण महाराजांकडून. मुजरा राजे…जय शिवराय…”
हेही वाचा – Video: ४७ वर्षांच्या बॉलीवूड अभिनेत्याने दुसऱ्यांदा केलं लग्न, २१ वर्षांच्या पत्नीसह शेअर केले व्हिडीओ
रुचिराची ही पोस्टवर सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. तिच्या कॅप्शन व लूकचं कौतुक केलं जात आहे.