बॉलीवूडमधील ९० च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे काजोल. काजोल आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर कित्येक वर्षं अधिराज्य गाजवत आहे. तिला अभिनयासाठी बरेच पुरस्कारही मिळाले आहेत. शिवाय २०११ साली काजोलला ‘पद्मश्री’ पुरस्कारानेही गौरविण्यात आलं आहे. अशा या हरहुन्नरी अभिनेत्रीचा सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओची भुरळ एका मराठमोळ्या अभिनेत्रीला पडली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – प्रवीण तरडे लवकरच दाक्षिणात्य चित्रपटात दिसणार, स्वतःच्या भूमिकेबाबत खुलासा करत म्हणाले…

ही मराठमोळी अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून सई लोकूर आहे. सई ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे फोटो व रील कायम चर्चेत असतात. सईनं इन्स्टाग्रामवर नुकतीच काजोलच्या व्हिडीओची स्टोरी शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये काजोल दिग्दर्शक करण जोहरबरोबर बोलताना दिसतेय. पण, त्यामध्ये काजोलच्या हावभावांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा – ‘ठरलं तर मग’ मालिकेतून आणखी एक एक्झिट; ‘या’ ज्येष्ठ कलाकाराच्या जागी दिसणार ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेता

काजोलचा हाच व्हिडीओ सईनं इन्स्टाग्राम स्टोरी म्हणून पोस्ट करीत लिहिलं आहे, “ती खूप खरी आहे आणि अजिबात फेक नाही. जसा तिचा स्वभाव आहे, तसंच तिचं वागणं आहे.”

हेही वाचा – “तुला स्टेजवर येऊन मारीन” असं उपेंद्र लिमये प्रवीण तरडेंना का म्हणाले होते? वाचा…

दरम्यान, सई लोकूरच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तिनं अनेक मराठी, हिंदी चित्रपटांत काम केलं आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वामुळे ती अधिकच प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. त्यानंतर सई ‘सनम हॉटलाइन’ या वेब सीरिजमध्ये झळकली होती. सध्या ती वैवाहिक जीवन एन्जॉय करताना दिसत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi fame sai lokur share bollywood actor kajol video pps