‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वामध्ये झळकलेली अभिनेत्री सई लोकूर नुकतीच आई झाली. तिने एका गोंडस मुलीला १७ डिसेंबर २०२३ रोजी जन्म दिला. ही आनंदाची बातमीने तिने सोशल मीडियाद्वारे दिली होती. तेव्हापासून सई लेकीचं नाव काय ठेवणार? कधी तिची पहिली झलक पाहायला मिळणार? याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. अखेर अभिनेत्रीने आपल्या गोंडस लेकीची पहिली झलक शेअर करत तिचं नाव देखील जाहीर केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – Bigg Boss 17: नॉमिनेशन टास्कमध्ये ‘बी टीम’ला एक चूक पडली महागात, थेट अंकिता लोखंडेसह ‘हे’ सदस्य घराबाहेर जाण्यासाठी झाले नॉमिनेट

अभिनेत्री सई लोकूरने नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने लेकीच्या पायाचा फोटो टाकून सुंदर पोस्ट लिहिली आहे. अभिनेत्रीने लिहिल आहे, “….अन् आज आम्ही एक महिन्याचे झालो…आमचा आनंद, आमचं गोड बाळ, आमची परी ताशी रॉय…डार्लिंग तू आज एक महिन्याची झालीस. आई-बाबा तुझ्यावर खूप प्रेम करतात. तू आम्हाला तुमचे पालक म्हणून निवडलंस आणि पालकत्वाचा विशेषाधिकार दिल्यास त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तू या जगातली खूप सुंदर गोष्ट आहेस…ताशीचा अर्थ समृद्धी आणि शुभ असा होतो.”

हेही वाचा – Video: …यामुळे मुक्ता देणार सागरला शिक्षा, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचा पाहा नवा प्रोमो

सईची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली असून चाहते भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. “खूप सुंदर नाव आहे, पण त्याचा अर्थ काय?,” अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत. तसेच काहींनी लेकीचा चेहरा कधी दाखवणार?, असं विचारलं आहे.

दरम्यान, सई लोकूरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने काही मराठी, हिंदी चित्रपटात काम केलं आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वामुळे ती अधिकच प्रसिद्धीच्या झोतात आली. त्यानंतर सई ‘सनम हॉटलाइन’ या वेब सीरिजमध्ये झळकली होती. सध्या ती अभिनय क्षेत्रापासून दूर असून लेकीबरोबर एन्जॉय करत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi fame sai lokur share her daughter first photo and name pps
Show comments