‘वैजू नंबर वन’ या लोकप्रिय मालिकेमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सोनाली पाटील नेहमी चर्चेत असते. ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वामुळे सोनाली अधिक प्रसिद्धीच्या झोतात आली. या पर्वातला अभिनेत्रीचा खेळ पाहून तिचा एक वेगळा चाहता वर्ग तयार झाला आहे. सध्या सोनाली अभिनय क्षेत्रात अधिक सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते. चाहत्यांबरोबर संपर्कात राहण्यासाठी फोटो, व्हिडीओ शेअर करत असते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकताच सोनाली पाटीलचा सख्खा भाऊ अभिजीत पाटील लग्नबंधनात अडकला. जवळील नातेवाईकांच्या उपस्थितीत सोनालीच्या भावाचा लग्नसोहळा पार पडला. लग्नानंतर आज सोनाली नव्या वहिनीसह दख्खनचा राजा जोतिबाच्या दर्शनाला पोहोचली होती. याचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा – Video: ऐश्वर्या नारकर यांनी अविनाश यांच्याबरोबरची शेअर केली जुनी आठवण, नेटकरी म्हणाले, “वर्षे निघून गेली तरी…”

“दख्खनचा राजा ज्योतिबा माझा…माझा देव…माझी साधी माणसं…तुझे आशीर्वाद,” असं कॅप्शन लिहित सोनालीने मंदिरा बाहेरील व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सोनालीचा नवविवाहित भाऊ व वहिनी दिसत आहे. यावेळी दोघांच्या डोक्यावर मुंडावळ्या पाहायला मिळत आहेत. तसंच सोनालीच्या कुटुंबातील इतर मंडळी देखील दिसत आहेत.

हेही वाचा – ड्रीम प्रोजेक्ट ‘लाल सिंग चड्ढा’ फ्लॉप झाल्यानंतर आमिर खानची झाली होती ‘अशी’ अवस्था, किरण रावने केला खुलासा

दरम्यान, सोनालीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने ‘वैजू नंबर वन’ या मालिकांव्यतिरिक्त ‘जुळता जुळता जुळतंय की’, ‘देवमाणूस’ यांसारख्या लोकप्रिय मालिकेत काम केलं आहे. एवढंच नाहीतर सोनालीने हिंदी मालिकेतही काम केलं. ‘वागले की दुनिया’ या हिंदी मालिकेत ती झळकली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi fame sonali patil brother married actress visit jyotiba temple with family pps